पदांच्या आकृतीबंदास मंजूरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदांच्या आकृतीबंदास मंजूरी
पदांच्या आकृतीबंदास मंजूरी

पदांच्या आकृतीबंदास मंजूरी

sakal_logo
By

पदांच्या आकृतिबंधास मंजुरी
---
इचलकरंजी महापालिका; प्रशासकीय कामकाजास गती येणार
इचलकरंजी, ता. २७ ः नुकत्याच स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेला आता चार सहायक आयुक्त, दोन उपायुक्त व एक अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे. या संदर्भातील विविध ३४ संवर्गातील पदांचा आकृतिबंध आज राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूर केला. या सर्व पदांची नजीकच्या काळात भरती करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजास पुढील काळात अधिक गती मिळेल.
इचलकरंजी पालिकेचे महापालिकेत रूपांतर करण्यात आले. मात्र, अद्याप आवश्यक अधिकारी वर्गाचा आकृतिबंध मंजूर नव्हता. त्यामुळे नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे अडचणीचे ठरत होते. याबाबत विविध संवर्गातील ३४ पदांच्या निर्मितीचा आकृतिबंध तयार करून त्याबाबतचा ठराव प्रशासकीय सभेत केला होता. प्रशासक सुधाकर देशमुख यांनी तातडीने हा ठराव मंजुरीसाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. त्याला आज मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे विविध ३३ पदांवरील अधिकारी नजीकच्या काळात महापालिकेस मिळणार आहेत.
सध्या अत्यंत अपुरे कर्मचारी आहेत. महापालिका झाल्याने प्रशासकीय कामकाजाचा पसारा वाढत आहे. त्यामुळे कामकाजात गती येण्यासाठी संवर्गातील नवीन पदांची भरती करणे आवश्यक बनले होते. याबाबत ‘ड’ वर्ग महापालिकेसाठी असणारी बहुतांश संवर्गातील बहुतांश पदे आता मंजूर झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय विभाग नजीकच्या काळात अधिक मजबूत होण्यास मदत होईल. सध्या प्रभारी अधिकाऱ्यांवरील महापालिकेच्या अतिरिक्त कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
---------
मंजूर पदसंख्या अशी ः
अतिरिक्त आयुक्त (१), उपायुक्त (२), सहायक आयुक्त (४), मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी (१), सहायक मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी (१), महिला व बालविकास अधिकारी (१), समाज विकास अधिकारी (१), विधी अधिकारी (१), सुरक्षा अधिकारी (१), सांख्यिकी अधिकारी (१), अधीक्षक (१), महापालिका सचिव (१), मुख्य लेखाधिकारी (१), लेखाधिकारी (१), मुख्य लेखापरीक्षक (१), उपमुख्य लेखापरीक्षक (१), आरोग्य वैद्यकीय अधिकारी (१), सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी (१), पशु शल्य चिकित्सक (१), शहर अभियंता/ जल अभियंता (१), कार्यकारी अभियंता (२), उपअभियंता (४), उपअभियंता- पाणीपुरवठा (१), सहायक संचालक- नगररचना (१), नगररचनाकार (१), सिस्टिम मॅनेजर- ई प्रशासन (१), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१), शिक्षण अधिकारी (१) शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी (२), परिवहन व्यवस्थापक (१), उपपरिवहन व्यवस्थापक (१), आगार व्यवस्थापक (१), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), सहायक अग्निशमन अधिकारी (१).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81314 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..