गांधी मैदान शिवसेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी मैदान शिवसेना
गांधी मैदान शिवसेना

गांधी मैदान शिवसेना

sakal_logo
By

38967

गांधी मैदानाची दुरवस्था दूर करा

अन्यथा मोर्चा; शिवसेनेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

कोल्हापूर, ता. २७ ः महापालिकेने मोठा निधी देऊन गांधी मैदानाची दुरवस्था दूर करावी. त्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर महापालिकेवर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा शिवसेनेतर्फे दिला. तसे निवेदन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले.
शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गांधी मैदानाची दुरवस्था का होत आहे, याचा सखोल अभ्यास न करता राजकीय लोकांनी सवंग घोषणा केल्या. राजकीय स्वार्थासाठी, दुरुस्तीसाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा केली. याबरोबरच प्रशासनही जबाबदार आहे. आतापर्यंत केलेल्या सुधारणांना मर्यादा आहेत. मैदानाची उंची, साठणारे व बाहेरून येणाऱ्या पाण्याचे योग्य निर्गतीकरण, सुशोभीकरण अशा बाबींचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा. कामांचे योग्य नियोजन करावे. महापालिकेने मोठा निधी द्यावा. लोकप्रतिनिधींच्या अर्थपूर्ण लाभाशिवाय काम पूर्ण केले जावे.
शिष्टमंडळात हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर, सागर साळोखे, धनाजी दळवी, सचिन चौगुले, स्वरूप मांगले, धनाजी यादव, अतुल साळोखे, रणजित आयरेकर आदी सहभागी होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81332 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..