स्मशानभूमी दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमी दुरवस्था
स्मशानभूमी दुरवस्था

स्मशानभूमी दुरवस्था

sakal_logo
By

38976

‘पंचगंगा स्मशानभूमीची
त्वरित दुरुस्ती करावी’

कोल्हापूर, ता. २७ ः पंचगंगा स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अन्यथा आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा लोकराज्य जनता पार्टीने निवेदनाद्वारे दिला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, स्मशानभूमीचे मोडकळीस आलेले शेड, गंजलेले पत्रे, त्यामुळे लागणारी गळती, घाणीचे साम्राज्य आदींमुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणी वाहत असल्याने शेवाळ पसरते. त्यातून घसरून पडण्याचा धोका आहे. दानशूर व्यक्ती, संस्था, तालीम मंडळे भरीव मदत करत असतात. पण, प्रशासक, लोकप्रतिनिधी नेमके काय करत आहेत. तातडीने दुरुस्ती न झाल्यास स्मशानभूमीमध्ये आंदोलन केले जाईल. शहराध्यक्ष संतोष बिसुरे, कार्याध्यक्ष विजय केसरकर, नितीन वरेकर यांनी निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81351 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top