केकच्या अत्याधुनिक शॉपीज्‌ अन्‌ ग्राहकांचा अफाट प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केकच्या अत्याधुनिक शॉपीज्‌ अन्‌ ग्राहकांचा अफाट प्रतिसाद
केकच्या अत्याधुनिक शॉपीज्‌ अन्‌ ग्राहकांचा अफाट प्रतिसाद

केकच्या अत्याधुनिक शॉपीज्‌ अन्‌ ग्राहकांचा अफाट प्रतिसाद

sakal_logo
By

लोगो :
केकमधील नवतंत्रज्ञान भाग- २

38982
केकसाठी आता खास सुपर मार्केट

निर्मितीचे सर्व साहित्य एकाच छताखाली; लॉकडाउन काळात मिळाली अर्थकारणाला चालना
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : पूर्वी केक फक्त बेकरीत मिळत असे, केकसाठी खास शॉपीज्‌ नव्हत्या. आधी ऑर्डर द्यावी लागे. काळ बदलत गेला. केकचे नवे रूप मार्केटमध्ये आले. नव्या रूपाला नवतंत्रज्ञानाचा साज सजत गेला.
आज केक हा महाउद्योगात रुपांतरित होत आहे. केकसाठी लागणारे सर्व काही एका शॉपमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागले. कोल्हापूरमध्ये तर खास केकचे साहित्य देणारे सुपर मार्केट सुरू झाले. हे सर्व तंत्रज्ञान दोन ते तीन वर्षांत कोल्हापुरात उपलब्ध झाले. पूर्वी केकचे साहित्य घेण्यासाठी पुणे, मुंबईकडे जावे लागे किंवा ऑनलाईन शॉपिंगद्वारे असे साहित्य मागवावे लागे. आज केक तयार करणारी प्रत्येक व्यक्ती अशा सुपर मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकते. नवीन फ्लेवर्स, नवीन लूक अशा सुपर मार्केटमध्ये मिळू लागले. प्रत्येकाला काम मिळाले. चार पैसे हाती येऊ लागले. अर्थकारणाला गती येऊ लागली. खास केकसाठी कमर्शियल क्लासेस सुरू झाले. केकची विक्रीही रोज होऊ लागली.


कोरोना लॉकडाउन काळात प्रत्येक घरात इन्कम सोर्सेस वाढविण्यासाठी अनेक जण केक मेकिंगमध्ये आले. यासाठी केकला लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी होम बेकर्स सुपर मार्केट ही नवीन संकल्पना दोन वर्षांपूर्वी शहरात उभी केली. आज सुपर मार्केटमध्ये केक, कुकीज, चॉकलेटस्‌साठी लागणाऱ्या सर्व तंत्रज्ञानातील टुल्स्‌, केकसाठी लागणारे जेल, फ्लेवर्स, स्टँडस्‌ आदी सर्व साहित्य घेण्यासाठी लोक दूरवरून येतात.’’
- रोहित कल्याणकर, केव्हीज्‌ फूडस्‌ बेकर्स सुपर मार्केट

सुपर मार्केटमध्ये काय मिळते?
-मॉकटेल/ पार्टी सप्लायर्स
-केक स्टॅण्डस्/ हॅण्ड मिक्सर्स
-स्पॅच्युला (क्रीम लावण्यासाठी)
-प्री मिक्स (इन्स्टंट केक तयार करण्यासाठी)
-बीटर (केकवर क्रीम लावणे)
-स्क्रॅपर/ टर्न टेबल
-कुकी कटर/ वेट स्केल/ स्प्रे गन
-चॉकलेट बार/ कंपाउंड चॉकलेटस्‌
-नोझल/ आयसींग बॅग्ज्‌
-केक स्टॅण्ड/ पॅन/ फिलिंग्ज्/ टॉपर्स/ फॉडंट/ फोटो केक प्रिंटस्‌
-सिलीकॉन मोल्डस्‌/ चॉकलेटस्‌ मोल्डस्‌/ चॉकलेटस्‌ रॅपर्स
-व्हीप क्रीम/ फूड इसेन्सीयल्स्‌- फूड ॲण्ड जेल कलर्स
...


आता भारतातही निर्मिती
पूर्वी केक, कुकीज्‌ लागणाऱ्या सर्व साहित्यांत चीनचा दबदबा होता. आता चिनी मार्केटचा प्रभाव कमी होऊ लागला, तसे भारतातील अनेक कंपन्या केकशी संबंधित साहित्य निर्मितीत उतरल्या आहेत. परिणामी, देशांतर्गत साहित्य मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागले. यामुळे अनेक लोक केकच्या उत्पादनात आले. रोजगार निर्मिती झाली. परदेशी केकच्या ब्रँडना टक्कर देणारे भारतीय ब्रँड तयार झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81364 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..