कारंडेमळा घरफोडीचा छडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारंडेमळा घरफोडीचा छडा
कारंडेमळा घरफोडीचा छडा

कारंडेमळा घरफोडीचा छडा

sakal_logo
By

३८९९९


कारंडेमळ्यातील घरफोडीचा छडा
२४ तासांत चौघे जेरबंद; ४४ काडतुसासह दोन एअर गन जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः कारंडेमळा येथील घरफोडीचा शाहूपुरी पोलिसांनी २४ तासांत छडा लावला. याप्रकरणी चौघांना जेरबंद केले. रियाज अन्वर सय्यद (सदरबाजार), फिरोज अल्लाबक्ष शेख (जवाहनगर), आदर्श ऊर्फ पिल्या संजय गायकवाड (सदरबाजार), देवराज ऊर्फ नकुल राजू जाधव (कावळा नाका) अशी संशयितांची नावे आहेत. त्याच्याकडून दोन एअर पिस्टल आणि ४४ जीवंत काडतुसे, डिजिटल लॉकर आदी मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, एका व्यावसायिकाचा कारंडे मळा येथील बंगला फोडून चोरट्याने लोखंडी डिजिटल लॉकर, दोन एअर गन, ४५ जीवंत काडतुसासह मुद्देमाल चोरीस गेला होता. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली होती. गुन्हे शोध पथकाने सदरबाजार भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू केली. यामध्ये त्यांना काही जण पत्त्यावर मिळून आले नाहीत. ही चोरी संशयित रियाज सय्यद आणि त्याच्या साथिदारांनी केली असून ते तलावाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयित रियाज, फिरोज, आदर्श आणि देवराज या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली असल्याचे गवळी यांनी सांगितले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले, अंमलदार ऋषिकेश पवार, युवराज पाटील, मिलिंद बांगर, शुभम संकपाळ, लखन पाटील, सागर माने, राहुल कांबळे यांनी केली. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील मोरे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81397 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top