इचल : अतिक्रमण मोहिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : अतिक्रमण मोहिम
इचल : अतिक्रमण मोहिम

इचल : अतिक्रमण मोहिम

sakal_logo
By

थोरात चौकातील
अतिक्रमण जमीनदोस्त
इचलकरंजी, ता. २७ ः महापालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा धडाका सुरूच आहे. आज थोरात चौक अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त केला. शहापूर म्हाडा कॉलनीतील १२ पत्र्यांचे शेड जमीनदोस्त केले.
काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश चौक व प्रमुख मार्ग आता मोकळा श्वास घेत आहेत, तर थोरात चौक अतिक्रमणयुक्त झाला होता. आज या परिसरात धडक मोहीम राबविली. यामध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला, पण विरोध डावलून कारवाई केली. यामध्ये एक पत्र्याचे शेड जमीनदोस्त केले, तर तीन खोकी जप्त करण्यात आली. फूटपाथवर असलेले हातगाडे हटविण्यात आले. त्यामुळे या चौकाने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, राजीव गांधी सांस्कृतिक भवन परिसरातून दोन हातगाडे जप्त केले. शहापूर येथील म्हाडा कॉलनी परिसरात पत्र्याचे शेड बांधले होते. आज पथकाने १२ शेड जमीनदोस्त केले. सुभाष आवळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81439 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..