गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

sakal_logo
By

38929
गडहिंग्लज : कित्तूरकर महाविद्यालयात कारगिल विजयदिनी हरीबा जाधव यांचा सत्कार करताना विजयकुमार चौगुले. शेजारी प्राध्यापक वर्ग.

कित्तूरकर महाविद्यालयात कारगिल विजयदिन
गडहिंग्लज : येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हा कार्यक्रम झाला. प्राचार्य विजयकुमार चौगुले अध्यक्षस्थानी होते. ऑनररी सुभेदार मेजर हरीबा जाधव प्रमुख पाहुणे होते. ते म्हणाले, ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सैन्याने टायगर हिल्स लष्करांच्या इतर सर्व चौक्यांवर कब्जा मिळविला. म्हणून कारगिल विजय दिवस हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आणि गौरवाचा आहे. सपना कुंभार हिने स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उपप्राचार्या अनिता पाटील, सुनिल देसाई, विद्या पन्हाळे, योगेश पाटील, सुरेश घस्ती, एन.व्ही. गावडे, विजय काळे, अश्‍विनी पाटील, दयानंद ग्वाडी आदी उपस्थित होते. हेमा दोडके यांनी सूत्रसंचालन केले. कुसूम कांबळे यांनी आभार मानले.
---------------
38932
गडहिंग्लज : माने महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करताना सौ. बिनादेवी कुराडे. शेजारी डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम व इतर.

माने कॉलेजमध्ये संवाद मेळावा
गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालयातील आर्टस विभागाचा शिक्षक-पालक संवाद मेळावा झाला. पालक प्रतिनिधी किरण पाटील, महिला पालक प्रतिनिधी रंजना रामाणे अध्यक्षस्थानी होते. शिवराजचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी स्वागत केले. डॉ. कुराडे यांनी आर्टस शाखेतून करिअर करण्याच्या खूप संधी असून विद्यार्थ्यांनी निवडलेली ही शाखा सार्थ ठरवावी, असे आवाहन केले. ज्येष्ठ पालक आनंदा कांबळे, गौराबाई न्हावी यांच्यासह अकरावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. कुराडे, डॉ. कदम, प्रा. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते झाला. डॉ. कदम, प्रा. कुराडे, संतोष पाटील, जयवंत पाटील यांची भाषणे झाली. जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रियांका जाधव, गीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी भांदुगरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81456 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..