
निवडणूक
३९०४८, ४९, ५०
‘सिटी क्रिमिनल बार’च्या
अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील
उपाध्यक्षपदी ॲड. कदम, सचिवपदी ॲड. कावणेकर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनची निवडणूक आज झाली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. चंद्रकांत पाटील, उपाध्यक्षपदी ॲड. पी. बी. कदम, तर सचिवपदी ॲड. पांडुरंग कावणेकर हे विजयी झाले.
क्रिमिनल बार असोसिएशनच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव पदांसाठी आज निवड प्रक्रिया घेण्यात आली. तीन पॅनेलमध्ये ही निवडणूक झाली. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी साडेचारपर्यंत मतदान घेण्यात आले. तीन पदासाठी आठ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये २१३ पैकी २०७ सदभासदांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. चंद्रकांत पाटील ८३ मते मिळवून विजयी झाले. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. पी. बी. कदम १०१ मते मिळवून विजयी झाले. सचिव पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ॲड. पांडुरंग कावणेकर यांना १२८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. विजय लांबोरे, ॲड. सोमनाथ नरमणी यांनी काम पाहिले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81460 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..