
शाळेत झाला मुख्यमंत्री
39043, 39045
शाळेत निवडले ईव्हीएमवरून मुख्यमंत्री
-
महापालिकेच्या प्रिन्सेस पद्माराजे विद्यालयात उपक्रम
कोल्हापूर, ता. २७ ः निवडणूक कशी असते? मतदान कसे करतात? ईव्हीएम मशिन कसे असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी महापालिकेच्या प्रिन्सेस पद्माराजे विद्यालयात निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
तंत्रस्नेही शिक्षक अमित जाधव यांनी प्रक्रिया राबवत पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गातून शिक्षण, परिपाठ, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, भोजन, माहिती तंत्रज्ञान, क्रीडा, वनमंत्री अशी पदे निवडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासाठी १० विद्यार्थी उमेदवार होते. एक दिवस प्रचारासाठी वेळ दिला. व्होटिंग मशिन ॲपद्वारे ईव्हीएम तयार करत फोटोसह उमेदवार यादी तयार केली. डिजिटल वर्गात मतदान प्रक्रियेची माहिती प्रोजेक्टरद्वारे दिली. ३० विद्यार्थ्यांनी मतदानात भाग घेतला, रांग लावली, तसेच विद्यार्थ्यास पोलिस बनवले. मुख्याध्यापक दस्तगीर मुल्ला यांनी केंद्राध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तसेच मतदारांच्या बोटाची शाई तपासली. शराबी देसाई, अमित जाधव, सुमन पोवार, शबाना मुजावर यांनी इतर जबाबदारी पार पाडली. मतदान संपल्यावर प्रोजेक्टरने निकाल दाखवला.
सफा पटेल (इयत्ता ४ थी) हिला सर्वाधिक १३ मते मिळाल्याने मुख्यमंत्रिपदी निवड जाहीर करण्यात आली. आयुष कुमार यास १२ मते पडल्याने उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढून आनंद साजरा केला.
कोट
आज मतदान मशिन कसे काम करते आणि मतदान कसे करतात हे सरांनी घेतलेल्या उपक्रमामुळे समजले. मतदान करताना मजा वाटली, वेगळा अनुभव मिळाला.
- आयुष कुमार, विद्यार्थी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81467 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..