
पीक स्पर्धेत सहभागी व्हा
खरीप हंगाम पीक
स्पर्धेत सहभागी व्हा
कोल्हापूर, ता. २७: राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा घेतली जात आहे. खरीप हंगाम २०२२ साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी अर्ज द्यावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.तालुका हा एक घटक आधारभूत धरून पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण ११ पिके समाविष्ट केली आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्यात सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या शेतावर त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी ५ व आदिवासी गटासाठी ४ आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये प्रवेश शुल्क आहे. मूग व उडिद पीकसाठी ३१ जुलै २०२२. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल- ३१ ऑगस्ट २०२२ पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहीत नमुन्यामध्ये भरुन त्यासोबत ठरवून दिलेले शुल्क चलन, सातबारा व ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करुन कृषी कार्यालयात द्यावे. तालुका पातळीवर पीकस्पर्धा विजेत्यांसाठी पहिले ५ हजार, दुसरे ३ हजार व तिसरे २ हजार रुपये. जिल्हा पातळीवरील पहिले १० हजार, दुसरे ७ हजार व तिसरे ५ हजार रुपये इतके तर विभाग पातळीवर पहिले २५ हजार, दुसरे २० हजार व तिसरे १५ हजार रुपये त्याचबरोबर राज्य पातळीवरील पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार व तिसरे ३० हजार रुपये इतके बक्षीस असेल. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81468 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..