रगेडियन तर्फे रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स फिटनेस जिम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रगेडियन तर्फे रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स फिटनेस जिम सुरू
रगेडियन तर्फे रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स फिटनेस जिम सुरू

रगेडियन तर्फे रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स फिटनेस जिम सुरू

sakal_logo
By

रग्गेडियनतर्फे फिटनेस
मल्टिप्लेक्स जिम सुरू

कोल्हापूर, ता. २७ : काही वर्षांपासून फिटनेससाठी कार्यरत रग्गेडियन संस्थेने २५ हजार स्क्वेअर फुटांच्या प्रशस्त जागेत अद्ययावत ५० हून अधिक मशिनरी असलेली
वातानुकुलीत रग्गेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स फिटनेस जिम सासने ग्राउंड परिसरात वाईल्ड मेमोरियल चर्च येथे सुरू केली आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिम. जिम २४ तास कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध असणार आहे.
‘रग्गेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स’ ही फिटनेस जिममध्ये ३६० डिग्री फिटनेस ट्रेनिंग दिले जाणार आहे. सर्वच प्रकारचे व्यायाम एकाच छताखाली जिममध्ये उपलब्ध असून येथे ग्रुप बॅचेस उपलब्ध आहेत. येथे ज्युदो, किक बॉक्सिंग, अॅथलेटिक, अँजिलिटी, सर्किट ट्रेनिंग, योगासह अनेक व्यायाम प्रकार करता येणार आहेत. सोबतच फिटनेस मल्टिप्लेक्स हे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. यात या फिटनेस जिमची व रग्गेडियनची माहिती मिळणार आहे. वेटलॉससाठी स्पेशल बॅचचीही सोय आहे. महिलांसाठी स्पेशल बॅच घेतली जाणार आहे. वीकेंडला मुव्ही नाईट, ट्रेक्स, कॅम्पस पार्टी आदी मनोरंजनही होणार आहे. येथे स्टीम, शॉवर, चेंजिंग रूम, लॉकरची सोय उपलब्ध असून डाएट हवे आहे. त्यांच्यासाठी डाएट क्लब कॅफेही सुरू केले आहे. रग्गेड कब ही किडस्‌ फिटनेस ॲकॅडमी असून, या ठिकाणी लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम शिकविले जातात. त्यात ही मुले आनंद घेतात. व्यायामाचे सर्व प्रकार फिटनेस हबच्या माध्यमातून करवीरकरांना उपलब्ध करून दिल्याचे आयर्न मॅन आकाश कोरगावकर यांनी सांगितले. तसेच, या फिटनेस हबचा कोल्हापूरकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81471 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..