
आधारांचा प्रादुर्भाव
साथरोग वाढू नये
याची खबरदारी घ्या
मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
्कोल्हापूर, ता. २७ : जिल्हा परिषदेच्या वतीने एकात्मिक डास निर्मूलन अभियानास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षात २३८ लोकांना डेंगीची लागण झाली होती. यात तिघांचा मृत्यू झाला होता. यावर्षी ११२ लोकांना लागण होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. डेंगीचा कहर वाढू नये म्हणून नियोजन केले आहे. यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यात मागील काही वर्षांत किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या आजारपणावर खर्च होतो. हा आर्थिक भार उचलणे अनेक कुटुंबांना अशक्य आहे. त्यामुळे हा आजार होऊ नये, यासाठी प्रभावी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. सामुदायिक प्रयत्न झाले तर डेंगीला नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे सांगत श्री. चव्हाण यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आवाहन केले.
डेंगी व साथरोग निर्मूलनसाठी जिल्हास्तरावर दर महिन्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे, विविध उपक्रमांसाठी निधीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यावर जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय मागील तीन महिन्यांचा तुलनात्मक ए. पी.आय. इंडेक्स अहवाल, कंटेनर सर्वेक्षण अहवाल, डासोत्पत्ती होणाऱ्या जागा व त्या ठिकाणी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा होऊन सूचना देण्यात आल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81476 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..