इचलकरंजी ः महापालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी ः महापालिका
इचलकरंजी ः महापालिका

इचलकरंजी ः महापालिका

sakal_logo
By

39060

इचलकरंजी महापालिका लोगो

निवडणूक कार्यक्रम जाहीर करा
माजी उपनगराध्यक्ष पोवार; निवडणूक आयोगाच्या अवर सचिवांना निवेदन

इचलकरंजी, ता. २७ : नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महापालिकेची सार्वत्रीक निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचीव अतुल जाधव यांना मुंबईतील कार्यालयात दिले. राज्यातील बहुतांशी पालिका, महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे श्री. जाधव यांनी यावेळी सांगीतले.
इचलकरंजी नगरपरिषदेचे रूपांतर नुकतेच महापालिकेत करण्यात आले. या बाबत प्रदीर्घ काळापासून लोकप्रतिनिधींचे प्रयत्न सुरू होते. त्याला जनतेचाही सहभाग मिळाला. त्यानुसार 29 जून रोजीच्या अधिसूचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी दुसरी महापालिका करण्यात आली. सध्या महापालिकेवर शासनाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी महानगरपालिका व नगरपालिका यांच्या निवडणुकी प्रक्रिया सुरू आहे. याच दरम्यान इचलकरंजी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर होईल असे अपेक्षित होते.
तथापि, अध्याप कांहीच हालचाली दिसून येत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेची यंत्रणा शासकीय अधिकारी यांनी प्रदीर्घ काळ पाहणे हे योग्य व लोकशाही तत्त्वांची प्रतारणा करणारा आहे. याचा विचार करून महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा. यामध्ये प्रभाग रचना तयार करणे, मतदार यादी तयार करणे आदीबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात करावी, अशी मागणी श्री.पोवार यांनी निवेदनात केली आहे.
माजी नगरसेवक मारुती पाथरवट, शंतनू पोवार, गणेश पोवार, महाज मुल्ला, शेखर विजापुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81509 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top