पश्चिम घाटाचे संवेदनशिल क्षेत्र वाचवा ः डॉ.बाचूळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम घाटाचे संवेदनशिल क्षेत्र वाचवा ः डॉ.बाचूळकर
पश्चिम घाटाचे संवेदनशिल क्षेत्र वाचवा ः डॉ.बाचूळकर

पश्चिम घाटाचे संवेदनशिल क्षेत्र वाचवा ः डॉ.बाचूळकर

sakal_logo
By

पश्चिम घाटातील संवेदनशिल क्षेत्र वाचवा
डॉ. मधुकर बाचुळकर; केंद्र सरकारला सूचना पाठण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने २०१३ मध्ये पश्चिम घाटातील सहा राज्यांमधील ५९ हजार ९४० चौ.कि.मी.चा परिसर ‘पर्यावर्णीय संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित केला. स्थानिक लोक आणि राज्य सरकारच्या विरोधानंतर हे क्षेत्र कमी करण्याचा विचार आहे. मात्र याबाबतची अधिसूचना जाहीर करून ‘गॅझेट ऑफ इंडियामध्ये’ प्रसिद्ध करून सरकारने याबाबत सूचना, संदेश, टीका-टिप्पणी मागितल्या आहेत. अधिकाधिक पर्यावरणप्रेमींनी संवेदनशिल क्षेत्र कमी न करण्यासाठी सूचना पाठवून पश्चिम घाटातील पर्यावर्णीय संवेदनशिल क्षेत्राचे संरक्षण करावे, असे आवाहन ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केले आहे. याबाबतचे पत्रकही त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
पत्रकातील माहितीनुसार, तज्ज्ञ समितीने ६० हजार चौरस कि.मी.चा पश्चिम घाटातील परीसर पर्यावर्णीय संवेदनशिल क्षेत्र म्हणून निर्देशीत केला होता. मात्र केरळ, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांनी याला विरोध केला. त्यामुळे पर्यावर्णीय संवेदनशिल क्षेत्र म्हणून निर्देशित केलेला ६० हजार चौरस कि.मी.चा परिसर ५६ हजार ८२५ चौरस किलोमीटरवर आणला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा पर्यावर्णीय दृष्टिकोनातून संवेदनशिल आहे. हा वाघ व हत्ती यांचा भ्रमणमार्ग आहे. तसेच जैवविविधतेच्या दृष्टीनेही हा तालुका महत्त्वाचा आहे; पण इतका संवेदनशिल परिसर संवेदनशिल यादीतून वगळला आहे. कारण या परिसरात खाणक्षेत्र आहे. अशाच पद्धतीने सहा राज्यातील पर्यावर्णीय संवेदनशिल परिसर कमी करण्याचा घाट आहे. संवेदनशिल क्षेत्रात समानेश झाल्यास विकास थांबेल, प्रकल्पांना मान्यता मिळणार नाही. असा गैरसमज राज्यकर्ते जनतेत पसरवत आहेत. यासाठी सर्व पर्यावरणप्रेमींनी याला विरोध करणे भविष्यातील पर्यावर्णीय समतोल ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. यासाठी अधिकाधीक विरोधाच्या सूचना, टिका-टप्पीणी केंद्र सरकारला पाठवणे गरजेचे आहे. असे आवहन पत्रकात करण्यात आले आहे.

अशी पाठवा सूचना
सेक्रेटरी, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायर्नमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, इंदिरा पर्यावरण भवन, सी.जी.ओ कॉम्प्लेक्स, जोर बाघ रोड, अलीगंज न्यू दिल्ली-११०००३ या पत्त्यावर पाठवाव्यात. किंवा esz-mef@nic.in या ई-मेलवर पाठवाव्यात.

प्रस्तावातील संवेदनशिल क्षेत्र
राज्यात एकूण १७ हजार ३४० चौ.कि.मी क्षेत्र संवेदनशिल म्हणून नव्या प्रस्तावात घोषित केले आहे. यामध्ये जिल्हानिहाय गावे पुढीलप्रमाणेतः (कंसात गावांची संख्या) रायगड (३५०), पुणे (३३७), सातारा (२९४), रत्नागिरी (२९२), ठाणे (२६१), सिंधुदूर्ग (१९२), कोल्हापूर (१८४), नाशिक (१५६), अहमदनगर (४२), सांगली (१२), धुळे (५), नंदुरबार (२)

अशा मागण्या असाव्यात
- संवेदनशिल क्षेत्राचे आकारमान कमी करू नये.
- येथे रिसॉर्ट बांधण्यास व वन पर्यटनास बंदी असावी.
- या क्षेत्रातील जमीन भाडेतत्वावर उद्योगांना देऊ नये.
- विदेशी वृक्षांच्या व्यापारी लागवडीस प्रतिबंध असावा.
- विदेशी वृक्षांची एकसुरी लागवड करू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81510 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top