
इचल : माजी विद्यार्थी मेळावा
39147
----------
विद्यार्थी सक्षम बनवण्यात माजी विद्यार्थ्यांचा
सहभाग महत्त्वाचा ः महादेव वाघमोडे
इचलकरंजी, ता. २८ : सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक जबाबदार असतो. सध्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या भावनेला मॅनेजमेंट करणारे मानसिक शिक्षण गरजेचे बनले आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या योगदानातून महाविद्यालयाची उंची वाढते, असे मत शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी व्यक्त केले.
डीकेएएससी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक शशांक बावचकर होते. महाविद्यालयाच्या भरभराटीत माजी विद्यार्थ्यांचे महत्त्व मोठे असते. पुढील काळात महाविद्यालयाला घडवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग गरजेचा असल्याचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांतर्फे गुणवंत व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते केला. यामध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी नियुक्तीबद्दल करिश्मा शेख, महानगरपालिकेच्या नगरसचिवपदी निवड झालेले विजय राजापुरे, भाई माधवराव बागल पुरस्कार प्राप्त प्रसाद कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक निवडीबद्दल सुहास पवळे, लष्करात निवड झालेले ओंकार माने यासह अविनाश सूर्यवंशी, पोलिस सागर हारगुले, सुनील पाटील या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान केला. स्वागत प्रा. मेजर मोहन वीरकर यांनी केले.
रोहित शिंगे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अरुण काशीद यांनी मानले. सूत्रसंचालन आतिष पाटील यांनी केले. माजी विद्यार्थी संघटनेचे राजन मुठाणे, प्रा. एम. एम. कांबळे, प्रकाश जगताप, प्रा. व्ही. बी. पाटील, दशरथ माने, प्रा. डी. ए. यादव, प्रा. डॉ. डी. जी. घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यास महाविद्यालयाच्या ५९ वर्षांतील माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81642 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..