जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

39161

व्रण घालविण्याची क्षमता
लक्षकिरणांचीच
डॉ. उद्धव पाटील ः जयपूरमध्ये प्लास्टिक सर्जन्सची वार्षिक परिषद

कोल्हापूर, ता. २८ ः प्लास्टिक सर्जरी नंतरचे व्रण सहसा उठून दिसत नाहीत. तरीसुद्धा जर ते पूर्णपणे घालवायचे असतील तर लेसर अर्थात लक्षकिरणांना पर्याय नाही, असे प्रतिपादन कॉस्मेटिक लेसर सर्जन डॉ. उद्धव पाटील यांनी केले. जयपूर येथील शिव-विलास पॅलेस येथे भरलेल्या राजस्थान प्लास्टिक सर्जन्सच्या वार्षिक परिषदेत ते निमंत्रित व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘अपघात, शस्त्रक्रिया, भाजणे किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेले उठून दिसणारे, खराब किंवा जाड झालेले व्रण पहिल्यांदा प्लास्टिक सर्जरीने कमी करून लगेचच त्यावर लक्षकिरणांचा उपचार केल्यास ते पुसटसे होत कमी होतात. ताज्या व्रणांसाठी तीन तरंग लांबीचे इंटेन्स पल्स लाईटस्‌ किंवा पल्स डाय लेसर, जुन्या व्रणांसाठी कार्बन डायऑक्साईड, अरेबियम याग आणि मायक्रोनीडल रेडिओ फ्रीक्वन्सी असे विविध पर्याय आता उपलब्ध आहेत. व्रणाची समीक्षा करून योग्य ते लेसर वापरण्यास सुरुवात केल्यास आठवड्यागणिक त्यात सुधारणा होते. परंतु, त्यासाठी व्रण तयार झाल्यावर तो आपोआप कमी होईल, अशा खोट्या आशेत न राहता प्लास्टिक सर्जन किंवा लेसर तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे हिताचे ठरते. उपचारासाठी अर्धा ते एक तास एवढाच वेळ लागतो.’ राजस्थान प्लास्टिक सर्जन्सचे अध्यक्ष डॉ. राकेश जैन आणी सचिव डॉ. वर्षा बुंदेले यांच्या हस्ते प्रसिद्ध हवामहलची प्रतिकृती देऊन डॉ. पाटील यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81665 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..