जोशाबा विचार मंचतर्फे सोमवारी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशाबा विचार मंचतर्फे सोमवारी कार्यक्रम
जोशाबा विचार मंचतर्फे सोमवारी कार्यक्रम

जोशाबा विचार मंचतर्फे सोमवारी कार्यक्रम

sakal_logo
By

जोशाबा विचार मंचतर्फे
सोमवारी शाहिरी मुजरा

कोल्हापूर, ता. २८ ः येथील जोशाबा विचार मंचतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त ‘अण्णा भाऊंची लेखणी-जगात देखणी अण्णा भाऊंना शाहिरी मुजरा’ हा पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी चार वाजता शाहू स्मारक भवनात कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली शाहीर बाबूराव कांबळे, संजय गुरव आणि युवराज पुजारी हे पोवाडे सादर करणार आहेत. दिनकरराव आवळे, दिलीप बाळकृष्ण, संघसेन जगतकर, युवराज घोरपडे प्रमुख पाहुणे आहेत. लक्ष्मण द्रविड, बाळासाहेब भोसले, प्रा. डॉ. पवनकुमार गायकवाड, प्रा. डॉ. सयाजीराव गायकवाड, सुशीलकुमार कोल्हटकर, बाजीराव नाईक, प्रा. अशोक आळतेकर, सदानंद डिगे आदींची प्रमुख उपस्थिती असेल. या वेळी वशिष्ठ रणदिवे यांचा विशेष सत्कार होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक शाहीर विजय शिंदे, व्यवस्थापक प्रा. आनंद हाबळे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81789 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top