निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

39298
अक्काताई शिंदे
कोल्हापूर ः अंबप येथील श्रीमती अक्काताई रामचंद्र शिंदे यांचे निधन झाले. त्या पंडित शिंदे यांच्या आई होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) आहे.
-
39301
सुंदाबाई पाटील
कोल्हापूर ः कोगे येथील श्रीमती सुंदाबाई दादू पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुंभी-कासारी सहकारी बँकेचे संचालक पैलवान रंगराव दादू पाटील यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३१) आहे.
-
03841
कमल रेळेकर
कागल : येथील कमल बजरंग रेळेकर (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर आयटीआयचे शिक्षक प्रदिप रेळेकर व प्रशांत रेळेकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.२९) आहे.
-
01602
गोपाळ पाटील
हळदी ः बाचणी (ता. करवीर) येथील माजी सरपंच गोपाळ ज्ञानू पाटील (वय ८७) यांचे निधन झाले. राजीव दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील यांचे वडील तसेच ग्रामपंचायत सदस्य निवास पाटील यांचे चुलते होत. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.२९)आहे.
-
39226
बन्सीलाल चौगले
कोल्हापूर : पंचशील कॉलनी, पाचगाव येथील बन्सीलाल चंद्रकांत चौगले (वय 66) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
-
39227
प्रा. सदाशिव घार्गे
कोल्हापूर : कसबा बावडा, माळ गल्ली येथील निवृत्त प्राध्यापक सदाशिव रामचंद्र घार्गे (वय 85) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
-
39229
सोनाबाई कांबळे
कोल्हापूर : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील सोनाबाई महादेव कांबळे (वय 85) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) आहे.
-
39230
रुक्मिणी चौगले
कोल्हापूर : खाटांगळे (ता. करवीर) येथील श्रीमती रुक्मिणी पांडुरंग चौगले (वय 92) यांचे निधन झाले. डी. एड. संघटनेचे जिल्हाध्यक्ष व ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन पेटाळाचे प्रा. डॉ. सुरेश चौगले, बालिंगे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी. पी. चौगले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.
-
39231
अमोल नलवडे
कोल्हापूर : टेस्टी कॉर्नर, प्रतिभानगर येथील अमोल शिवाजीराव नलवडे (वय 35) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
-
39232
विजया पाटोळे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, वारे वसाहत येथील सौ. विजया दिनकर पाटोळे यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) आहे.
-
39237
प्रभाकर पेडणेकर
कोल्हापूर : गणेश कॉलनी, आयटीआय जवळील प्रभाकर रवळनाथ पेडणेकर यांचे निधन झाले. ते निवृत्त नायब तहसीलदार होते.
-
39240
हिंदूराव गोटखिंडे
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील हिंदूराव भाऊसो गोटखिंडे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, नातू, नाती, पुतणे असा परिवार आहे.
-
39241
महादेवराव महाडिक
कोल्हापूर : पोवार कॉलनी, कुपटे कॉर्नर, पाचगाव येथील महादेवराव भाऊसो महाडिक (वय ८३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३०) आहे.
-
39243
अन्नपूर्णा भोसले
कोल्हापूर : टाकाळा, माळी कॉलनी येथील श्रीमती अन्नपूर्णा पंडितराव भोसले (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) आहे.
-
39246
रमेश भालकर
कोल्हापूर : शनिवार पेठ, परिट गल्ली येथील रमेश गोपाळ भालकर (वय ७०) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ३०) आहे.
-
03108
चांदू पाटील
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील आदर्श शेतकरी पुरस्कार चांदू तातोबा पाटील (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी(ता.‌२९) आहे.
-
03033
रूक्मिणी मुदूगडे
सोळांकूर : पनोरी ( ता. राधानगरी) येथील श्रीमती रूक्मिणी नाना मुदूगडे (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) आहे.
-
gad287.jpg 39296
नारायण गायकवाड
गडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील नारायण लक्ष्मण गायकवाड (वय 80) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नात असा परिवार आहे. ‘सकाळ’चे एजंट महादेव गायकवाड यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. 31) आहे.
-
07009
पी.वाय.कुंभार
घुणकी : वाठार तर्फ वडगांव (ता.हातकणंगले) येथील माजी सरपंच पी. वाय. तथा पांडुरंग यशवंत कुंभार (वय १०२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे
चार मुलगे, दोन मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३१) आहे.
-
02488
रामचंद्र मोरे
शिरोली पुलाची : मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील रामचंद्र नारायण मोरे (वय ७५) यांचे निधन झाले. अभिनव कॉम्प्युटरचे अध्यक्ष अनिल मोरे व सन इन्फोटेक कॉम्पुटरच्या संचालिका अनिता सूर्यवंशी यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.३०)आहे.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81794 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..