१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

ईपीएस ९५ निवृत्तिवेतनवाढ जाहीर करावी
सर्वोच्च न्यायालयातर्फे पूर्ण करण्यात आलेली न्यायालयीन प्रक्रिया व केंद्र सरकारतर्फे न्यायालयीन आदेशाचा आदर राखून पूर्ण केलेली सकारात्मक कार्यवाही यामुळे आता केंद्रीय श्रममंत्र्यांनी ईपीएस ९५ निवृत्तिवेतनवाढ तत्काळ जाहीर करावी. देशभरातील या निवृत्तिवेतनधारकांच्या संघटनांतर्फे महागाई भत्त्यासह नऊ हजार ५०० रुपये निवृत्तिवेतनवाढीची मागणी होत आहे. श्रममंत्र्यांनी देशातील विविध संघटनांशी चर्चा करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. सध्या या निवृत्तिवेतनधारकांना एक हजार इतक्या तुटपुंज्या रकमेत कुटुंबाचा चरितार्थ चालविणे मुश्‍कील झाले आहे. देशभरात दोन वर्षे कोविडने उडवलेला हाहाकार, कडक लॉकडाउन व वाढती महागाई यामुळे निवृत्तिवेतनधारक अत्यंत हलाखीत जीवन जगत आहेत. या निवृत्तिवेतनधारकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले असून, निवृत्तिवेतनवाढीची गरज निर्माण झाली. जीवनावश्‍यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमती हैराण करून सोडत आहेत. पंतप्रधान व श्रममंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून निवृत्तिवेतनवाढ तत्काळ जाहीर करावी. बँक खात्यात वाढीव रक्कम जमा करून आर्थिक आधार व दिलासा द्यावा.
एस. एल. कुलकर्णी, कोल्हापूर

गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत
कोल्हापूर शहरात आज अनेक ठिकाणी गतिरोधक तयार केले आहेत. त्यांची उंची कोठेही एकसारखी नाही. काही ठिकाणी ते उंच केले आहेत. तसेच, कोठेही पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकास गतिरोधक आहेत, हे समजत नाही. एखादा वाहनचालक वेगात आला तर अपघात होऊन जीव गमावण्याची भीती नाकारता येत नाही. तसेच, यापूर्वी अनेक छोट्या-मोठ्या घटना घडलेल्या आहेत. संबंधितांनी यात लक्ष घालून गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत. जेणे करून वाहनचालकाला गतिरोधकांचा अंदाज येऊ शकेल.
दिलीप ओतारी, कोल्हापूर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81816 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..