​पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

​पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन
​पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन

​पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन

sakal_logo
By

​पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन
२८ ऑगस्ट​ला आयोजन
कोल्हापूर​, ता. २८ ​:​ ​डेक्कन स्पोर्टस्‌ क्लब व असोसिएशन इन शांतिनिकेतनतर्फे ​पन्हाळा हिल मॅरेथॉन ​२८ ऑगस्ट​ला होणार आहे. स्पर्धेतील सहभाग निश्चिती सुरू असून ३१ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली. ​पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा असा संदेश या मॅरेथॉनमधून दिला जाणार आहे. ‘रन फॉर हेरिटेज कंझर्वेशन’ हे स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. या वेळी डेक्कन स्पोर्टस्‌‌ क्लबतर्फे गड किल्‍ल्याचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन केले. स्पर्धेसाठी दिल्ली, लातूर, सोलापूर, हुबळी, धारवाड, बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी नाव नोंदणी केलेली आहे.​​ ही मॅरेथॉन २१, ११ व ५ किलोमीटरची असून यातील २१ किलोमीटर स्पर्धा सकाळी ६ वाजता​ सुरू होणारआहे. ​स्पर्धकांना गुडी बॅग, टी. शर्ट, फीनीशर मेडल, टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी) ई -सर्टिफिकेट नाश्ता दिले जाणार आहे. ​​​तर मार्गवर ७५ स्वयंसेवक असणार आहेत. पत्रकार परिषदेस ​समीर नागठिळक​,​ उदय पाटील, आयर्नमॅन वैभव बेळगावकर, असोसिएशन इन शांतिनिकेतनचे उपप्राचार्य श्रीपाद पाटील ​उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81852 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..