आरक्षण सोडतीवेळी उत्‍कंठा शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षण सोडतीवेळी  उत्‍कंठा शिगेला
आरक्षण सोडतीवेळी उत्‍कंठा शिगेला

आरक्षण सोडतीवेळी उत्‍कंठा शिगेला

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


आरक्षण सोडतीवेळी उत्‍कंठा शिगेला
जुन्या आरक्षणांचा उलगडा; सभागृहात रंगला आशा-निराशेचा खेळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २८ : सर्किट हाउस येथे आज झालेल्या जिल्‍हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतेवेळी इच्‍छुकांची उत्‍कंठा चांगलीच शिगेला पोहोचली होती. पाच वर्षे राबलेल्या मतदारसंघात कोणते आरक्षण पडणार, स्‍त्री की पुरुष, चिठ्ठीत आपणाला अपेक्षित आरक्षण पडणार का अशा अनेक प्रश्‍‍नांमुळे इच्‍छुकांची उत्‍कंठा शिगेला पोहेाचली होती. सोयीचे आरक्षण पडल्यानंतर खुलणारा चेहरा व गैरसोय झाल्यानंतर पडणारा कपाळावर हात, असे दृश्‍य आज झालेल्या आरक्षण सोडतीवेळी दिसून आले. तर आरक्षण थेट पाहण्याचे धाडस न झाल्याने अनेक माजी सदस्य इतर सहकाऱ्यांना फोन करून आरक्षणाची माहिती घेताना दिसून आले.
जिल्‍हा परिषदेच्या ७६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली. आरक्षण सोडत काढण्यापुर्वीच अनुसूचित जाती, जमाती, महिला, ओबीसी आरक्षण काढण्याच्या पद्धतीबाबत जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक वर्गवारीचे आरक्षण काढत असताना २००२ पासून ते २०१९ पर्यंतच्या आरक्षणाचा विचार करुन आरक्षण निश्‍चित होणार असल्याचे सांगतिल्याने, अनेकांनी मनाची तयारी केलेली पहायला मिळाली.
आरक्षण सोडतीची सुरुवातच अनुसूचित जाती गटांच्या आरक्षणाने झाली. यावेळी उतरत्या क्रमाने गटामध्ये असलेल्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची माहिती दिली होती. समोर दिसणाऱ्या स्‍लाईडमध्ये आपला गट कितव्या क्रमांकावर आहे, हे इच्‍छुकांकडू्न पाहिले जाते. आपला गट जास्‍त पुढे व मागे नसल्याने आपल्या गटात आरक्षण पडत नसल्याचा अंदाज आल्यावर संबंधितांच्या चेहर्‍यावर हस्याची लकेर पाहायला मिळत होती. आरक्षणाच्या चिठठ्या काढताना लहान मुलांच्या हाताला आपली चिठ्ठी लागू नये, यासाठीही इच्‍छुकांकडून प्रार्थना केली जात होती. ओबीसी आरक्षण काढताना इच्‍छुकांमध्ये सर्वाधिक हुरहूर पहायला मिळाली.

करवीरमध्ये महिलाराज
करवीर तालुक्यात एकूण १३ गट आहेत. यातील ९ गटात महिलांना संधी मिळणार आहे. माजी अध्यक्ष अध्यक्ष राहुल पाटील यांच्या परिते गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. अशीच इतर मतदारसंघांची अवस्‍था आहे. त्यामुळे कोणाच्या पत्‍नीला, कोणाच्या सुनेला करवीरमध्ये संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

आरक्षणाकडे महिलांची पाठ
जिल्‍हा परिषदेत महिलांसाठी ५० टक्‍के जागा राखीव आहेत. तरीही सोडतीवेळी एकही महिला उपस्थित नव्‍हती. विद्यमान महिला सदस्यांकडूनही त्यांचे पतीच हजर होते. निवडून आले तरीही अपवाद वगळता बहुतांश महिला सदस्यांच्या वतीने त्यांचे पतीच कारभार करतात. त्यामुळे महिला आरक्षण आले तरीही महिलांचा कारभारातील सहभाग अजूनही अत्यल्‍पच असल्याचे स्‍पष्‍ट होत आहे.

दोन ऑगस्‍टपर्यंत हरकती
जिल्‍हा परिषद व पंचायत समिती आरक्षणाबाबत हरकती असतील तर त्या २९ जुलै ते २ ऑगस्‍टपर्यंत घेता येणार आहेत.ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांनी २ ऑगस्‍टपर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी सव्‍वा सहा या वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81855 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top