
कोरोना
जिल्ह्यात दिवसात
नवे २२ बाधित
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः जिल्ह्यात आज दिवसभरात २२ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. २९ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४७ झाली आहे. यातील २७ व्यक्तींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर १२० व्यक्ती सौम्य लक्षणांच्या असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाची चिंता अद्यपि कायम आहे.
दीड महिन्यात कोरोनाची संख्या वाढत आहे त्या तूलने त कोरोना मुक्ता हमार्यचचीप्रणमा कमी होता गेल्या दोन दिवसापासून कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सरासरी रोज २५ ते ३० व्यक्ती कोरोना मुक्त होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होत आहे. असे असले तरी घरगुती स्तरावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १२० आहे. त्याच्यावरही आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहे. ज्या घरात राहायला जागा कमी आहे अशा घरातील कोरोनाबाधिताला शासकीय रूग्णालयातही उपचार घेण्यासाठी ॲडमीट होत आहे. मात्र फक्त व्याधी ग्रस्त वयोवृध्द व्यक्ती असल्यातरी त्यांची ॲडमीट होऊन उपचार घेत आहेत. असेही दिसते प्रभावी उपचार तसेच लसीकरणामुळे कोरोना बरा होण्याचे प्रमाण ही वाढत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81857 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..