हाळोलीत टस्कराचा धुडघुस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हाळोलीत टस्कराचा धुडघुस
हाळोलीत टस्कराचा धुडघुस

हाळोलीत टस्कराचा धुडघुस

sakal_logo
By

39268
हाळोली (ता. आजरा) : येथील पांडुरंग गुरव यांच्या शेतात उसाचे झालेले नुकसान.

हाळोलीत टस्कराचा
ऊस पिकात धुडगूस
तळ ठोकल्याने शेतकरी हवालदिल
आजरा, ता. २८ : हाळोली (ता. आजरा) येथे टस्कराने धुडघुस घातला आहे. त्यांने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गेले आठ दिवस हाळोली गावात टस्कर मुक्काम ठोकून असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. टस्कराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
चाळोबा जंगलातून टस्कर सायंकाळच्या वेळी हाळोलीच्या शिवारात उतरतो. येथील ऊस पिकावर ताव मारतो. पुन्हा पहाटे तो जंगलात परततो. टस्कराच्या वाढत्या उपद्रवामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत. गेले दोन दिवस टस्कर पांडुरंग गोविंद गुरव यांच्या धामण शेतात उतरला. त्यांने गुरव यांच्या ऊस पिकात धुडघुस घातला. दहा गुंठे उसाचे नुकसान केले. गुरव यांचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टस्कराने परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान केले आहे. वनपाल एस. पी. गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला.

वावरण्यामुळे नुकसान जास्त
टस्कर पिक फस्त करून जास्त नुकसान होत नाही. तो जर शेतातील पिकात इकडून तिकडे वावरत राहिला तर पिकाचे जास्त नुकसान होते, असेशेतकऱ्यांनी सांगितले.

आजरा-नेसरी मार्गावर टस्कर
दरम्यान, बुधवारी (ता. २७) रात्री आजरा-नेसरी मार्गावर टस्कराचे वाहनधारकांना दर्शन झाले. रामतिर्थ शिक्षक पतसंस्थेचे व्यवस्थापक विजय पताडे हे कार्यालयाचे काम आटोपून घरी निघाले होते. सिरसंगी जवळील रामलिंगजवळ टस्कर अचानक त्यांच्या दुचाकीच्या आडवा आला. त्यामुळे पताडे यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी केला. टस्कर रस्ता ओलांडून शेतात उतरल्यावर ते मार्गस्थ झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81858 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..