पेपर फुटीप्रकरणी १२ जणांची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेपर फुटीप्रकरणी १२ जणांची चौकशी
पेपर फुटीप्रकरणी १२ जणांची चौकशी

पेपर फुटीप्रकरणी १२ जणांची चौकशी

sakal_logo
By

पेपरफुटी प्रकरणी
१२ जणांची चौकशी
प्रमाद समिती दोन दिवसांत देणार अहवाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी आज १२ जणांची चौकशी झाली. सुमारे ४ तास ही चौकशी चालली. परीक्षा प्रमाद समितीने त्यांच्याकडे चौकशी केली असून पुढील २ दिवसात याचा विस्तृत अहवाल समिती विद्यापीठाला सादर करेल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.
विद्यापीठाच्या बीएससी फिजिकल केमेस्ट्री या विषयाचा पेपर परीक्षेआधीच फुटला होता. सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने ही बाब उघडकीस आणली. त्यामुळे त्या दिवशी पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर चार दिवसांनी या विषयाची परीक्षा झाली. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पेपर फोडला असल्याचा संशय असून याची चौकशी सुरू आहे. आज दोन महाविद्यालयातील १२ जणांची चौकशी प्रमाद समितीच्या सदस्यांनी केली. यामध्ये प्राचार्य, शिपाई, पर्यवेक्षक, कर्मचारी यांचा समावेश होता. महाविद्यालयाचे सीसीटीव्ही फुटेजही समितीने तपासले आहे. चौकशीनंतर पुढील दोन दिवसात याचा विस्तृत अहवाल प्रमाद समिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाला सादर करेल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81866 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..