इचल: रोटरी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: रोटरी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
इचल: रोटरी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

इचल: रोटरी तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

39316
-----------
शिक्षणामधूनच विद्यार्थ्यांची जडणघडण
व्यंकटेश देशपांडे; रोटरीतर्फे विद्यार्थी दत्तक योजना
इचलकरंजी, ता. २९ : आजच्या युगात शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिक्षणामधूनच विद्यार्थ्यांची जडणघडण होत असून, त्यातून उद्याचा समाज उत्तम प्रकारे घडू शकतो. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी सहकार्य करणे मोलाचे असल्याचे प्रतिपादन रोटरीचे प्रातपाल व्यंकटेश देशपांडे यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेताना येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणींवर मात करून जिद्दीने आणि कष्टाने उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामधून त्यांची आणि कुटुंबाची प्रगती होईल, असे प्रा. संध्या देशपांडे यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक कथा सांगितल्या. इचलकरंजी शहर व परिसरातील २१ हायस्कूलमधील १२० विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग आणि सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य वितरित केले. उपक्रमास सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार केला. पन्नालाल डाळ्या, अशोक जैन, राजेंद्र सांगले, जय जाखोटिया, घनश्याम सावलानी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख प्रशांत कांबळे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81938 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top