जनवादी महिला संघटनेतर्फे निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनवादी महिला संघटनेतर्फे निदर्शने
जनवादी महिला संघटनेतर्फे निदर्शने

जनवादी महिला संघटनेतर्फे निदर्शने

sakal_logo
By

39338
----------
जनवादी महिला संघटनेतर्फे निदर्शने
इचलकरंजीत प्रांताधिकारी कार्यालयातर्फे मागण्यांचे निवेदन सादर
इचलकरंजी, ता. २९ : घरगुती गॅस सिलिंडरवर सबसिडी सुरू करून वर्षाला १२ सिलेंडरचा पुरवठा करावा. केंद्र सरकारने अन्नधान्यावर लावलेली जीएसटी मागे घ्यावी, रेशन व्यवस्थेत डाळी, खाद्यतेल, साखर आदी १४ अत्यावश्यक वस्तूंसह केरोसीनचा पुरवठा करावा, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले. या वेळी निदर्शने केली.
वाढत्या बेरोजगारीमुळे घटलेले उत्पन्न आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची झालेली भाववाढ यामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीचे तातडीने सार्वत्रिकरण व बळकटीकरण करण्यासाठी पावले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दरवाढ कमी करावेत, रेशनमधून मिळणाऱ्या धान्यात वाढ करावी, वितरण व्यवस्थेतील बायोमेट्रिकचा वापर थांबवावा, निराधार वयोवृद्ध व महिला यांचे थकीत अनुदान त्वरित द्या, अनुदानासाठी उत्पन्न मर्यादा वाढवा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात केला आहे. चंद्रकला मगदूम, मुमताज हैदर, दिलशाद देसाई, अक्काताई तेली, जरीना सुतार, राजमा मुल्ला, रेवती मडके, शोभा चिंचोळे, लक्ष्मी शिंदे, ललिता हुल्ले, अर्चना पाटील, लता साळुंखे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y81954 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..