यच मुक्त विद्यापीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यच मुक्त विद्यापीठ
यच मुक्त विद्यापीठ

यच मुक्त विद्यापीठ

sakal_logo
By

मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम बंद
ऑनलाईन प्रवेश सुरू ः दहावी, बारावी नापासांना फटका
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः ज्यांचे शिक्षण अर्धवट झाले आहे, अशांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्‍ट्र मुक्त विद्यापीठाच्या शंभरावर अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत आहे. पूर्व तयारी अभ्यासक्रम करून थेट पदवी अभ्यासक्रमाला मिळणाऱ्या प्रवेशाची पद्धत बंद केली आहे. त्यामुळे दहावी, बारावी नापास किंवा त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात येणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे यंदाची पदवी प्रवेश परीक्षा बारावी उर्त्तीण विद्यार्थ्यासाठीच होईल.

विविध कारणाने शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण थांबले, अनेकांना इच्छा असूनही पुढे शिक्षण घेता आले नाही. अशा वर्गाला बारावीनंतर थेट पदवी किंवा उच्च शिक्षण घेण्याची संधी मुक्त विद्यापीठाने दिली. दोन वर्षांत पावणेसहा लाख विद्यार्थी पदवी शिक्षणाच्या प्रवाहात आले.
यंदा बदलत्या काळाची गरज ओळखून मुक्त विद्यापीठाने अभ्यासक्रमांची रचना केली. यात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे, नवीन व्यवसायाभिमुख व कौशल्यावर आधारित नवे अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. विद्यापीठाच्या मानव्यविद्या, सामाजिक शास्त्र, वाणिज्य व्यवस्‍थापन, संगणक शास्त्र, आरोग्य विज्ञान, विज्ञान तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, शिक्षण शास्त्र अशा विद्याशाखांर्तगत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू झाले आहेत. त्यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
बी.ए. पदवीनंतर हिंदी, मराठी, उर्दू, इंग्रजी, ग्रंथालय, माहितीशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन या विषयात एम.ए. करण्याची संधी उपलब्ध आहे. वाणिज्य शाखेत बी.कॉम., एम.कॉम., एम.बी.ए., बी.बी.ए. करण्याची संधी आहे. याचबरोबर विज्ञान शास्त्र शाखेत बी.एस्सी., एम.एस्सी. करता येते.

रोजगाराला चालना देणारे प्रशिक्षण
याशिवाय पाणी व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षण, सलून व टेलरिंग व्यवसाय, व्हिडीओ निर्मिती, छायाचित्रण, पटकथा लेखन, ग्राम रोजगार सेवक, शेती कंपनी व्यवस्थापन सहकार, व्यवस्थापन, शालेय व्यवस्थापन असे विविध कौशल्याधिष्ठित अनेक पदविका प्रमाणपत्र शिक्षण विद्यापीठात उपलब्ध केले आहेत. त्याच अभ्यासक्रम ऑनलाईन प्रवेश आहे.

पूर्वतयारी अभ्यासक्रम पद्धत बंद
ज्या व्यक्ती दहावी, बारावी नापास आहेत. अशांना मुक्त विद्यापीठ पूर्वतयारीचा तीन महिने अभ्यासक्रम घेऊन पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना थेट मुक्त विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश दिला जात होता. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगानेही प्रक्रिया बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या वर्षीपासून ज्या व्यक्ती बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांना पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे दहावी, बारावी नापासांनाही पदवी शिक्षणाचा मार्ग रोखला गेला आहे. याबाबत विद्यापीठाकडून विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दाद मागितली जाते आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82053 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top