नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या
नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

नूल परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

38480
नूल : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी कल्लाप्पाण्णा नडगदल्ली, जयसिंग चव्हाण, जे. डी. वडर, अजित वाळकी आदी.

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
गुणवंत विद्यार्थी सत्कार
नूल : नूल (ता गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूल टेक्नीकल अँड ज्युनिअर कॉलेजमधील दहावी व बारावी परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा नडगदल्ली होते. प्राचार्य जे. डी. वडर यांनी प्रास्ताविक केले. दहावीतील श्रेया पाटील, समृद्धी पाटील, संजीवनी मांगले, सानिका माने, बारावीतील लक्ष्मी कडलगे, कृष्णा माने, तनुजा देसाई यांच्यासह एन. एम. एम. एस. व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देऊन सत्कार झाला. विठ्ठल दिवटी, अस्मिता चव्हाण या हॉकी खेळाडूंचा विशेष सत्कार झाला. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. या वेळी राशी थोरात, सिताराम कदम, श्रेया पाटील, तनुजा देसाई या विद्यार्थ्यांची तर पी. बी. नांदवडेकर, एस. आर. काळे, जयसिंग चव्हाण यांची भाषणे झाली. रामगोंडा पाटील, भीमाप्पा मास्तोळी, अजित वाळकी, बी . टी . पाटील आदी उपस्थित होते. संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. ए. आर. हिरेमठ यांनी आभार मानले.
--------------------
38481
तेरणी : ए. आर. देसाई प्रशालेतील नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळासोबत मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग.

तेरणी प्रशालेत जिमखाना निवडणूक
नूल : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील ए. आर. देसाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जिमखाना निवडणूक झाली. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी ए. आय. नरेवाडी यांनी ऑनलाइन मतदान घेतले. निवडणुकीनंतर निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बलराम भोई व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून समीक्षा नरेवाडी यांची निवड झाली. त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्री म्हणून संस्कार सुतार, क्रीडामंत्री म्हणून अनिल खंडाळे, सहल मंत्री ओंकार शिंदे, बांधकाम मंत्री बसवराज देसाई, वाचनालय मंत्री शशिकांत मलकांनावर, आरोग्य मंत्री ओंकार देसाई यांची निवड झाली. झोनल अधिकारी म्हणून मुख्याध्यापक प्राचार्य डी. वाय. माने यांनी काम पाहिले. निवडणूक पार पाडण्यासाठी एस आय कांबळे, व्ही. एस. निलवे यांनी परिश्रम घेतले. सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82083 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..