पुलांमधील गाळ काढण्यास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलांमधील गाळ काढण्यास प्रारंभ
पुलांमधील गाळ काढण्यास प्रारंभ

पुलांमधील गाळ काढण्यास प्रारंभ

sakal_logo
By

39453
----
पुलांमधील गाळ काढण्यास प्रारंभ
टाकवडे-शिरढोण मार्ग; नुकसानग्रस्त ४० एकर शेतीतील शेतकऱ्यांना दिलासा
इचलकरंजी, ता. २९ ः पावसाळ्यात टाकवडे-शिरढोण मार्गावर ठिकठिकाणी शेतात पाणी साचते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी छोटे पूल बांधले आहेत. मात्र, तेथे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह थांबला आहे. यामुळे सुमारे ४० एकर शेतीचे नुकसान होत होते. पाण्यामुळे बाधित होणाऱ्‍या या शेतकऱ्‍यांनी एकत्र येऊन याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर कार्यालयात गाऱ्‍हाणे मांडले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने पुलांच्या ठिकाणी पाणी प्रवाहित करण्याचे काम सुरू केले.
इचलकरंजी-कुरूंदवाड मार्गावरील शिरढोण-टाकवडेदरम्यान दरवर्षी पावसाळ्यात शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. शेतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठिकठिकाणी पूल बांधले आहेत. मात्र, त्या पुलांच्या ठिकाणी गाळ व कचरा अडकल्याने पाण्याचा प्रवाह पुढे जात नव्हता. परिणामी, लक्ष्मी मंदिर ते हनुमान बेकरी या दरम्यानच्या ४० एकर क्षेत्रातील शेतकऱ्‍यांचे वीस वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्‍यांनी संघटितपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जयसिंगपूर कार्यालयात जाऊन गाऱ्‍हाणे मांडले. अधिकाऱ्‍यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने पुलाच्या ठिकाणी पाणी प्रवाही करण्याचे काम सुरू केले. यामुळे पाणी न साचता पुढे प्रवाही होण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82115 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..