
निधन वृत्त
39466
यशवंत सूर्यवंशी
कोल्हापूर : कसबा बीड (ता. करवीर) येथील यशवंत आबा सूर्यवंशी (वय ८०) यांचे निधन झाले. ते इंदुमती एचपी गॅस कसबा बीडचे मालक प्रकाश सूर्यवंशी आणि शेती उत्पन्न बाजार समितीचे लिपिक जयसिंग सूर्यवंशी यांचे वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ३१) आहे.
-
39467
सुनंदा कदम
कोल्हापूर : न्यू शाहूपूरी, पाटणकर कॉलनी येथील सौ. सुनंदा बाळासाहेब कदम (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त अधिक्षक जिल्हा व सत्र न्यायालयाचे बाळासाहेब कदम यांच्या त्या पत्नी होत. रक्षाविर्सजन रविवारी (ता. ३१) आहे.
-
39468
शोभा सुर्यवंशी
कोल्हापूर : जागृतीनगर हौसिंग सोसायटी येथील सौ. शोभा मच्छिंद्रनाथ सुर्यवंशी (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा, पती, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
-
39516
डॉ. महादेव सोमशेट्टी
आजरा : येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. महादेव गुरुलिंगाप्पा सोमशेट्टी (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दि. आजरा अर्बन बॅंकेचे ते माजी अध्यक्ष होते. जनता एज्युकेशन सोसायटी आजराचे उपाध्यक्ष, अण्णा भाऊ आजरा तालुका सूतगिरणीचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. लिंगायात समाज आजरा आणि आजरा मेडिकल असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य होते. माती सावडण्याचा विधी रविवारी (ता. ३१) आहे.
-
39295
भारती गुंजाटी
आजरा : येथील भारती संगम गुंजाटी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. येथील कापड व्यापारी संगम गुंजाटी यांच्या त्या पत्नी होत.
-
02433
नामदेव अतिग्रे
माजगाव ः पडळ (ता.पन्हाळा) येथील नामदेव हिंदुराव अतिग्रे (वय ४३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन रविवारी (ता.३१) आहे.
-
01739
शिरमाबाई नारकर
राशिवडे बुद्रुक ः पुंगाव (ता. राधानगरी) येथील शिरमाबाई रामचंद्र नारकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
-
02783
आत्माराम निर्मळे
कुरुंदवाड ः सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील माजी सैनिक आत्माराम कृष्णा निर्मळे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, मुलगा, सून, मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.३१) आहे.
-
00765
विलास पाटील
सातवे ः येथील विलास हिंदुराव पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता.३०) आहे.
-
01589
विश्वास खोपकर
पिंपळगाव ः जकिनपेठ (ता. भुदरगड) येथील विश्वास संतराम खोपकर (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (३१)आहे.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82130 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..