
कोवाड- दारु भट्ट्या उदध्वस्त
३९४६९
यर्तनहट्टीतील गावठी
हातभट्ट्या उद्ध्वस्त
---
संशयित पसार; दारूसह कच्चे रसायन नष्ट
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २९ ः यर्तनहट्टी (ता. चंदगड) येथे अनेक दिवसांपासून पोलिसांना आव्हान ठरलेल्या दोन बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्ट्या आज कोवाड पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस नाईक आर. पी. किल्लेदार, कॉन्स्टेबल अमोल देवकुळे व कुणाल शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून १६० लिटर कच्चे रसायन, ५० लिटर उकळते रसायन, १५ लिटर तयार दारूसह मुद्देमाल हस्तगत केला. कारवाईत संशयितांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश आले नाही. संशयित आरोपी व्हन्याप्पा निंगाप्पा सनदी व आप्पूजी निंगाप्पा सनदी (यर्तनहट्टी) यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
यर्तनहट्टी येथे गेल्या महिन्यात दोन गावठी हातभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. पुन्हा त्याच भागात हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने कोवाड पोलिसांनी आज सकाळी सापळा रचून छापा टाकला. यात व्हन्याप्पा सनदी यांच्या शेतात व आप्पूजी सनदी यांच्या शेतात हातभट्ट्या घातल्या होत्या. पोलिसांची चाहूल लागताच संशयित पळून गेल्याचे समजते. पोलिस नाईक किल्लेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भट्ट्या उद्ध्वस्त करून मुद्देमाल जप्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82135 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..