
राजाराम कारखाना
राजाराम कारखान्याकडून
‘हर घर तिरंगा’साठी ध्वज
कोल्हापूर ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानासाठी कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना सभासदांना मोफत तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. सभासदांनी घरावर ध्वज फडकावून अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन संचालक माजी आमदार अमल महाडीक यांनी केले आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत १३ ते १५ ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवला जावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कारखान्यामार्फत शेतकर्यांसाठी विविध कृतिशील उपक्रम राबवले जातात. अनेक नवनवीन प्रगतशील पावले उचलत कारखान्याने सामाजिक भान जपले आहे. या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून सभासदांना मोफत तिरंगा ध्वज देण्यासाठी सर्वप्रथम राजाराम कारखान्याने पुढाकार घेतला याचा अभिमान वाटतो. सोबतच इतर साखर कारखाने व सहकारी संस्थांनीही या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा अशी विनंतीही श्री. महाडीक यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82157 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..