निम्म्या शहराचे पाणी सोमवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निम्म्या शहराचे
पाणी सोमवारी बंद
निम्म्या शहराचे पाणी सोमवारी बंद

निम्म्या शहराचे पाणी सोमवारी बंद

sakal_logo
By

निम्म्या शहराचे
पाणी सोमवारी बंद
कोल्हापूर, ता. २९ : शिंगणापूर योजनेवरील ११०० मिलिमीटर मुख्य वितरण नलिकेवरील गळती सोमवारी (ता. १) दुरुस्त केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण पाणी उपसा बंद करावा लागेल. त्यामुळे शिंगणापूर जल उपसा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड, संलग्न उपनगरांमध्ये सोमवारी पाणीपुरवठा होणार नाही. मंगळवारी (ता. २) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
ए, बी वॉर्ड व त्यास संलग्न भागातील फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजे संभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, वारे वसाहत, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपिंगवरील संपूर्ण भाग, वाय. पी. पोवारनगर, ई वॉर्डमधील राजारामपुरी, मातंग वसाहत, यादवनगर, शाहू मिल कॉलनी, शिवाजी उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंशन, पाच बंगला, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, तोरणानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी, गोळीबार मैदान, उलपे मळा, रमण मळा, नागाळा पार्क, लोणार वसाहत, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, व्यापार पेठ परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले. महापालिकेकडील उपलब्ध टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82161 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..