सैन्य भरती आवाहन - बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्य भरती आवाहन - बैठक
सैन्य भरती आवाहन - बैठक

सैन्य भरती आवाहन - बैठक

sakal_logo
By

नोव्हेंबरमध्ये होणार
‘अग्निपथ’ची सैन्य भरती
दत्तात्रय कवितके; सहकार्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः येथे २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले.
जिल्ह्यात अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती होणार आहे. या सैन्य भरतीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा व दक्षिण गोवा या जिल्ह्यातील अंदाजे ८० हजार युवक सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कोल्हापूर जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आर्मी रिक्रुटींग ऑफिसचे संचालक कर्नल पाल तसेच त्यांचे सहकारी, प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रशांत खेडेकर, सैन्य भरतीशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सैन्य भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मैदान व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहन व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82166 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top