जलशक्ती अभियान प्रभावी राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जलशक्ती अभियान प्रभावी राबवा
जलशक्ती अभियान प्रभावी राबवा

जलशक्ती अभियान प्रभावी राबवा

sakal_logo
By

लोकसहभागातून जलशक्ती अभियान राबवा
धर्मराज खाटिक; केंद्रीय जलशक्ती अभियान समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : जलशक्ती अभियान हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, लोकसहभागातून हे अभियान प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जलशक्ती अभियानाचे केंद्रीय समन्वयक तथा कोल्हापूर व सांगली समिती प्रमुख धर्मराज खाटिक यांनी केल्या. जलशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीबाबत श्री. खाटिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जलशक्ती मंत्रालयाचे उपसंचालक डी. गणेशकुमार, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर. तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री. खाटिक म्हणाले, जलशक्ती अभियान हे ‘जनशक्ती अभियान’ व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता उपलब्ध पाणी अपुरे पडू नये, यादृष्टीने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी देशपातळीवर जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर भूजलाची पातळी वाढविणे व जलप्रदूषण रोखण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. या मंत्रालयाद्वारे देशातील २५६ दुष्काळी जिल्ह्यात पावसाचे पाणी साठवण्याचे उपक्रम सुरू केले आहेत. तसेच, रेनवॉटर हार्वेस्टिंगवर भर देऊन जलसंधारणाची कामे केली आहेत. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची माहिती दिली. तसेच केंद्रीय जलशक्ती समितीकडून कामांची पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82186 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..