वारसांनाही मिळणार प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारसांनाही मिळणार प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये
वारसांनाही मिळणार प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये

वारसांनाही मिळणार प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये

sakal_logo
By

वारसांनाही मिळणार पन्नास हजार
शासनाचा दिलासा : प्रोत्साहनपर अनुदानाचा दीडशे ते दोनशे लोकांना मिळणार लाभ
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या पण मृत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांनाही प्रोत्साहनात्मक रक्कमेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर ते दीडशे शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षाचा कालावधी गृहित धरून तीनही आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी एका पेक्षा जास्त बॅंकांमूधन पीककर्ज घेतले आहे. अशा शेतकऱ्यांना सर्व बॅंकेच्या रकमेचा विचार करून जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये दिले जातील. तसेच हे प्रोत्साहनपर रक्कम ऑनलाईन पद्धतीने दिले जातील. कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहित धरण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बॅंका, खाजगी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेतले जाणार आहे. २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकरीही या योजनेस पात्र असणार आहेत. तसेच एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारसांनाही प्रोत्साहनपर योजनेत लाभ दिला जाणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


प्रोत्साहनात्मक अनुदान यांना मिळणार नाही
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील लाभार्थी
- राज्यातील आज-माजी मंत्री, आमदार, खासदार
- केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (यातून २५ हजार मासिक वेतन असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून)
- महावितरण, एस.टी. महामंडळ व अनुदानित संस्थांचे अधिकारी
- कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बॅंका, जिल्हा बॅंका व सहकारी दूध संघाचे अधिकारी व पदाधिकारी (ज्यांना २५ हजार रुपयांपेक्षा कमी मासिक पगार आहे असे लोक वगळून)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82203 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..