
काँग्रेस नेत्यांनी माफी मागावी ः शौमिका महाडिक
काँग्रेस नेत्यांनी देशाची
माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे
शौमिका महाडिक; अधिररंजन यांचे वक्तव्य प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी केलेली टिप्पणी असभ्य आहे. त्यातून काँग्रेसच्या हीन संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. चौधरी यांच्या वक्तव्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रोत्साहन दिल्याने महिलांचा, आदिवासी समाजाचा आणि राष्ट्रपतिपदाचा अवमान झाला आहे, असा आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केला. काँग्रेसच्या नेत्यांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे, असेही सांगितले. याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
पत्रकात महाडिक यांनी म्हटले आहे, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीस विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्थेस बट्टा लावणाऱ्या काँग्रेसजनांनी राष्ट्रपतींचा अपमान होत असताना मौन का बाळगले, गुरुवारी (ता. २७) अधिररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबाबत अवमानकारक उल्लेख केला. अपमान करण्याच्या उद्देशाने चौधरी यांच्याकडून हा उल्लेख होत असताना सोनिया गांधी यांनी मात्र दुर्लक्ष केले. सभागृहाच्या शिस्तीला आणि सभ्यतेच्या संकेतास बट्टा लावण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून वारंवार होत असतो. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांचा अपमान करण्यासाठी सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक चौधरी यांना फूस लावली का? हेही पाहिले पाहिजे. काँग्रेसची ही महिलाविरोधी मानसिकता देशासमोर उघड झाली आहे. तेव्हा या उद्दामपणाबद्दल सोनिया गांधी, अधिररंजन चौधरी आणि सर्व काँग्रेसजनांनी देशाची माफी मागून प्रायश्चित्त घेतले पाहिजे, अशी टीका महाडिक यांनी पत्रकातून केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82205 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..