संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

मोहरमच्या पर्वाला
उद्यापासून होणार प्रारंभ
कोल्हापूर ः हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमच्या सणाला रविवारपासून (ता. ३१) प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी उद्या (शनिवारी) बाबूजमाल दर्ग्यात सायंकाळी सात वाजता कुदळ मारण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. याचदरम्यान सर्वत्र हा विधी होईल. रविवारी (ता.३१) रात्री दहाला मानाच्या नाल्याहैदर पंजाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर शहर आणि परिसरात अडीचशेहून अधिक पंजांची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनामुळे दोन वर्षे मोहरमवर निर्बंध होते. मात्र, यंदा हा सण कोणत्याही निर्बंधाशिवाय मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
............
पोलिस लाईनमधील
नादुरूस्त नळ बंद
कोल्हापूर ः जुना बुधवार पेठ पोलिस लाईनमध्ये सध्या बांधकाम सुरू आहे. मात्र, येथे जोडलेल्या नळपाणी योजनेचे सध्या वापरात नसलेले नळ नादुरूस्त झाले होते. त्यातून रोज कैक हजारो लिटर पाणी वाया जात होते. याबाबतची पोस्ट आज सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. नादुरूस्त असणारे व तोट्या नसलेले काही नळ बंद करण्यात आले. येथे वाया जाणाऱ्या पाण्याबाबतही उपाययोजना केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82215 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top