अमोल भास्करसह दोघांना खंडणी प्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमोल भास्करसह दोघांना
खंडणी प्रकरणी अटक
अमोल भास्करसह दोघांना खंडणी प्रकरणी अटक

अमोल भास्करसह दोघांना खंडणी प्रकरणी अटक

sakal_logo
By

L39521 - अमोल भास्कर
L39520ः संकेत व्हटकर

अमोल भास्करसह दोघांना
खंडणी प्रकरणी अटक
कोल्हापूर, ता. २९ ः खंडणीसाठी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेणाऱ्या कुख्यात गुंड अमोल भास्कर (वय ३९, रा. जवाहरनगर) तसेच त्याचा साथीदार संकेत सुरेश व्हटकर (२३, रा. बिजली चौक, जवाहरनगर) याला आज राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद अमित बाळासाहेब बुकशेठ (३८, रा. कसबा बावडा) यांनी दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः यातील व्हटकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही मोका अंतर्गत कारवाई झाली असून, सध्या तो जामिनावर बाहेर होता. अमित बुकशेठ मे २०२१ मध्ये रात्री जवाहरनगर चौकात थांबले होते. या वेळी अमोल भास्कर, संकेत व्हटकर, अजित पाटील मोटारीतून निघाले होते. तिघेही अमितला पाहून चौकात थांबले. तिघांनी अमितला खंडणीचे पैसे देण्यासाठी धमकावले. शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास कुटुंबाला ठार करण्याची धमकी दिली. या वेळी त्यांनी अमितच्या हातातील आठ तोळ्यांचे ब्रेसलेट हिसकावून घेतले. यानंतर २४ नोव्हेंबर २०२१ ला पुन्हा असाच प्रकार शास्त्रीनगर येथील रेड्याच्या टकरीजवळ भास्कर आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. मात्र, भास्कर याच्या दहशतीमुळे अमित यांनी पोलिसांत तक्रार देणे टाळले. दरम्यान, आणखी काही गुन्ह्यांत राजारामपुरी पोलिसांनी भास्करला अटक केली व ज्यांच्या त्याच्या बाबतीत तक्रारी असतील, त्यांनी येऊन फिर्याद देण्याचे आवाहन केले. या वेळी अमित यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आज दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दोघांना सोमवार (ता. १)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82216 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top