कळंबा कारगृहातील कैद्याचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबा कारगृहातील कैद्याचा मृत्यू
कळंबा कारगृहातील कैद्याचा मृत्यू

कळंबा कारगृहातील कैद्याचा मृत्यू

sakal_logo
By

जयसिंगपुरात निष्काळजीपणे
वाहन चालवणाऱ्यांना शिक्षा
जयसिंगपूर ः शहरात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी न्यायालयाने संशयितांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. कुमार शंकर कलगुटगी (संभाजीपुर), संदीप बाळासो पाटील (दानोळी), राहुल बाळू सावंत (उदगाव), यलाप्पा अपासाहेब मुरडे (शिरढोण), गणेश लालसो खांडेकर (जयसिंगपूर), चंद्रकांत बाळासो पवार (चिपरी), रितेश रतनलाल शहा (सांगली), प्रकाश सिदराम दारेकर (सांगली) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. नाईक आनंदा बंडगर, सचिन चौगुले, सुरेश तोडकर, कॉन्स्टेबल कांशीराम कांबळे यांची साक्ष न्यायालयात घेतली. सरकारी वकील म्हणून सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले.

39511
देवर्डेत टस्कराने केला पाॅवर ट्रेलर पलटी
आजरा ः देवर्डे (ता. आजरा) येथे टस्कराने पाॅवर ट्रेलर पलटी केला आहे. त्यामुळे शेतकरी शिवाजी सोले यांचे नुकसान झाले आहे. टस्कर शेतातील कृषी साहित्याचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. देवर्डे व हाळोली परिसरात टस्कर ठाम मांडून आहे. त्यांने येथील शेतकऱ्यांच्या मेसकाठी, केळी, ऊस पिकाचे नुकसान करीत आहेत. सध्या या परिसरात भातरोप लावणीचे काम सुरु आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर, पाॅवर ट्रेलर शेतात लावून येत असतात. श्री. सोले यांनी दुसऱ्या दिवशी चिखल करावयाचा म्हणून पाॅवर ट्रेलर शेतात लावला होता. टस्कराने तो पलटी करून टाकला. पाॅवर ट्रेलरचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर टस्कराने हाळोली, देवर्डे परिसरातील ऊस व बांबूचे नुकसान केले आहे.


कोल्हापुरातील तरुणावर हल्ला
गांधीनगर ः पत्नीला मोबाईलवरून वारंवार कॉल करणाऱ्यास जाब विचारण्यास गेलेल्या प्रदीप तुकाराम पाटील (मूळ गिरगाव ता. करवीर, सध्या सोना अपार्टमेंट, शिवाजी चौक, कोल्हापूर) यांना तिघा अज्ञातानी शिवीगाळ करत कोयत्याने वार व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. हा प्रकार उचगाव पुलाजवळ झाला. प्रदीप पाटील यांच्या पत्नीला एक व्यक्ती मोबाईलवरून सतत त्रास देत होता. ज्या नंबरवरून फोन आला त्यावर प्रदीप पाटील यांनी फोन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने उद्दाम भाषा वापरली व उचगाव पुलाजवळ येण्यास सांगितले. तेथे प्रदीप गेले असता तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. याबाबत जखमी प्रदीप पाटील यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.

टोपच्या दुचाकी चोरट्यास अटक
नागाव : शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शिये फाटा येथे मोटारसायकल चोरास अटक केली. आशुतोष चंद्रकांत पाटील (वय २४, टोप, ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन वाहने जप्त केली. शिये फाटा येथे गस्त पथकाने आशुतोष पाटील याला मोटारसायकलवरून जाताना अडवले. मोटारसायकलीस नंबर प्लेट का नाही असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केली असता शिये-बावडा रोडवरील सुपर बाजारच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. बुधवारी (ता. २७) मोटारसायकल चोरीची फिर्याद देणाऱ्या घुणकीच्या अवधूत संभाजी ढेरे यांना बोलावून घेऊन कागदपत्रांची खात्री केली असता मोटारसायकल ढेरे यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. पाटीलने गांधीनगर येथून मोपेड चोरल्याचे सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पवार, समीर मुल्ला, प्रवीण काळे हे तपास करत आहेत.

शहापुरातील गावठी अड्डे उद्‍ध्वस्त
इचलकरंजी : शहापूर पोलिस ठाण्याने विविध तीन ठिकाणी गावठी हातभट्टी दारू विक्रीचे अड्डे उद्धवस्त केले. याप्रकरणी तिघांना अटक केली. बेबी किसन जाधव (गंगानगर), अमर राज गागडे (शांतीनगर इचलकरंजी), आकाश राजेश मलके अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सुमारे १५० लिटर हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त केला. ही कारवाई शहापूर पोलिसांनी निर्मल ट्रान्सपोर्ट गंगानगर,तारदाळ नाका आणि खोतनगर तारदाळ येथे केली.

निमशिरगावात एकाची आत्महत्या
जयसिंगपूर ः निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे सम्मेद सुकुमार खोत (वय २२) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना आज सायंकाळी सहाच्या सुमारास घटना घडली. याबाबत वीरेंद्र परिसा पाटील (वय ४८ कोथळी) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक फौजदार सोमनाथ चळचूक करीत आहेत.

उदगावातील महिलेची आत्महत्या
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजुम अर्षद जमादार (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (ता. २९) दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली. गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पुढील तपास पोलीस नाईक निलेश भोसले करीत आहे.

कळंबा कारागृहातील कैद्याचा मृत्यू
कोल्हापूर ः कळंबा मध्यवती कारागृहातील कैदी संदीप बळीराम गांगण (वय ५३, मुंबई) याची प्रकृती बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याची प्रकृती बिघडली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82219 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top