
दस्त नोंदीसाठी ऑनलाईन होणार
दस्त नोंदीसाठी ऑनलाईन
मुद्रांक शुल्क निश्चिती
कोल्हापूर, ता. २९ ः मुद्रांक शुल्क निश्चित करण्यास अवघड असणाऱ्या किंवा मुद्रांक शुल्क निश्चितीबाबत नागरिकांना अडचण वाटत असते. अशा प्रकरणामध्ये मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दस्तऐवजासह अर्ज केल्यास ऑनलाईन मुद्रांक शुल्क निश्चित केले जाणार आहे. सोमवार (ता. १) पासून ही प्रणाली कार्यरत केली जाणार आहे.
प्रणालीमध्ये शासनाने सुलभता येण्यासाठी ई-अभिनिर्णय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीचा वापर बंधनकारक आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांना विहीत मुदतीत सेवा उपलब्ध होणार आहे. नागरिकांना प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करणेसाठी या प्रणालीचा वापर करता येणार आहे. ऑनलाईनमुळे प्रकरणामध्ये राबविण्यात येणारी प्रक्रीया जसे नोटीस, अतिंम आदेशाची प्रत, ऑनलाईन पध्दतीनेच नागरीकांना कार्यालयामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रणालीबाबत सविस्तर माहिती विभागाच्या लिंक www.igrmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कसबा बावडा रोड, कोल्हापूर या ठिकाणीही माहिती उपलब्ध आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82222 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..