पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

B00467

निवेडत गॅस कटरच्या साह्याने
एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न
असळज : एका राष्ट्रीय बँकेच्या साळवण शाखेचे निवडे येथील एटीएम मशीन फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न काल रात्री चोरटयांनी केला. पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. गगनबावडा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, निवडे येथील बाजारात बँक शाखेचे नजीकच एटीएम सेंटर आहे. एटीएममधील रोकड चोरण्याच्या हेतूने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कट करून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मशीनची मोडतोड केली. मात्र रक्कम चोरुन नेण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. याबाबतची फिर्याद गगनबावडा पोलिस ठाण्यात उत्तम भिमराव राणे यांनी दिली असून गगनबावडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गगनबावडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

सिलिंडर चोरणाऱ्यास नागरिकांनी पकडले
कोल्हापूर : रस्त्याकडेला थांबलेल्या टेंपोतील सिलिंडर चोरणाऱ्यास नागरिकांनी बेदम चोप दिला. सलीम शेख (शिवाजी पेठ) असे संशयिताचे नाव आहे. त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार आज सकाळी जुना बुधवार पेठेत घडला. घटनास्थळासह पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, टाऊन हॉल परिसरातील गॅस एजन्सीचा कर्मचारी दुलाजी शिवाजी शिंदे टेंपो मधून भरलेली सिलिंडर घेऊन घरोघरी पोहचविण्यासाठी जुना बुधवार पेठेत गेले होते. रस्त्याकडेला टेंपो थांबवून ते अरुंद गल्लीत सिलिंडर देण्यास गेले. दरम्यान, संशयित सलीम शेख याने टेंम्पोतील सिलिंडर चोरुन नेले. हा प्रकार परिसरातील नागरीकांच्या लक्षात आला त्यांनी त्याला पकडून चोप दिला. घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. दरम्यान दुलाजी शिंदे यांनी १७ जुलैला गवंडी मस्जीद, गिरणी कॉर्नर येथून अज्ञाताने आणखी एक सिलिंडर चोरल्याचेही तक्रार दिली.

इचलकरंजीत सापडलेले ब्रेसलेट परत
इचलकरंजी : वडिलांना एकसष्टीनिमित्त हॉटेलमध्ये कार्यक्रम ठेवून दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट दिले. कार्यक्रमानंतर ते ब्रेसलेटच हरवल्याचे लक्षात आले. हरवलेले ब्रेसलेट सापडलेल्या व्यक्तीने गावभाग पोलिसात दिले. प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी अमर सूर्यवंशी यांचा सत्कार केला. येथील गावभागातील निशांत देसाई यांच्या वडिलांच्या एकसष्टीनिमीत्त देसाई कुटुंबीयांनी एका हॉटेलमध्ये कार्यक्रम ठेवला होता. कुटुंबीयांनी आप्पासो यांना दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट भेट दिले; मात्र ते हरवल्याचे कार्यक्रमानंतर लक्षात आले. शोधाशोध करूनही न मिळाल्याने गावभाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान मंगळवार पेठ परिसरातील अमर सूर्यवंशी यांच्या पत्नीला दाते मळा परिसरात ते मिळाले. ते देण्यासाठी गावभाग पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी देसाई यांच्याशी संपर्क साधून ब्रेसलेटबाबत खात्री केली. सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी अमर सूर्यवंशी यांचा सत्कार केला.


04244
इचलकरंजी : मद्यपी रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी करत रिक्षाचालकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

मद्यपी रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी
इचलकरंजी : येथील रिक्षा स्टॉपवर येऊन कोरोचीचे काही मद्यपी रिक्षाचालक धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे त्या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी करत रिक्षाचालकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिले. हरीभाऊ पाटील, दिपक हरेल, मनोहर पाटील, संजय सावंत, अस्लम किल्लेदार, रईस मोमीन उपस्थित होते.

रिक्षा पलटून महिला जखमी
कोल्हापूर ः सोन्या मारुती चौक परिसरात काल दुपारी रिक्षा पलटून झालेल्या अपघातात महिला जखमी झाली. रेखा गोसावी असे जखमींचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82286 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..