कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घ्या ः प्रा.डॉ. प्रदीप कुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घ्या ः प्रा.डॉ. प्रदीप कुमार
कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घ्या ः प्रा.डॉ. प्रदीप कुमार

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घ्या ः प्रा.डॉ. प्रदीप कुमार

sakal_logo
By

39647

कुशल मनुष्यबळाची देशाला गरज

प्रा.डॉ.सोनकवडे ; ‘स्तुति‘ योजनेअंतर्गत कार्यशाळा


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः देशातील ६६ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, देशाच्या भविष्यातील विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. यासाठी कुशल आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ मुबलक असणे गरजेचे असून त्यासाठी स्तुती सारख्या योजना महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या सैफ केंद्राचे प्रमूख प्रा.डॉ.आर.जी.सोनकवडे यांनी केले. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय (DST), शिवाजी विद्यापीठ, आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्तविद्यमाने स्तुति (सिनरजिस्टिक ट्रेनिंगप्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) योजनेअंतर्गत आयोजीत कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हैदराबाद येथील आटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेटचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीपकुमार होते.
यावेळी डॉ.सोनकवडे म्हणाले, ‘जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्या भारतात आहे, एकूण लोकसंख्येपैकी ६६ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. देशाच्या भविष्यातील तांत्रिक विकासाचा विचार करता हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचा आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला विशेषत: लातूर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या अंतर्गत भागाशी संपर्कसाधायचा होता. त्यामुळे ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
औद्योगिक क्षेत्राचा विकास तेव्हाच होऊ शकेल. ज्यावेळी देशात कुशल आणि प्रशिक्षीत मनुष्यबळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल. यासाठीच स्तुतीसारख्या योजना महत्त्वाच्या आहेत.
अध्यक्षीय भाषणात डॉ.प्रदीपकुमार यांनी स्तुती उपक्रमाचे कौतुक केले. कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हे योग्य पाऊल उचलले असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यापीठातील आणि संलग्न महाविद्यालयातील सुमारे १५० संशोधक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञानविभागाचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, समन्वयक राजाराम माने, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82416 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..