कलाप्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाप्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रिया
कलाप्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रिया

कलाप्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रिया

sakal_logo
By

‘कलाप्रबोधिनी’मध्ये
प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
कोल्हापूर, ता. २९ ः येथील कलाप्रबोधिनीज् इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ही संस्था महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व शिवाजी विद्यापीठ संलग्नीत असून या संस्थेमध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (बी. डेस) इंटिरिअर डिझाईन हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम शिकवला जातो. त्यासाठी आता प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी टक्केवारीची अट नाही. कोणत्याही नीट, सीईटी या पात्रता परीक्षेची गरज नाही. अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरू झाले असून चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
महाविद्याला नॅकचे मानांकन प्राप्त झाले असून इंटिरिअर डिझाईनचे शिक्षण देणारी ही राज्यातील अग्रेसर संस्था आहे. बारावी आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी या सर्व शाखेतील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. डिप्लोमाधारकांना थेट द्वितीय वर्षास प्रवेश दिला जाणार आहे. आउट कम बेस ऐज्युकेशन,
आयसीटी बेसड् टिचिंग लर्निंग, तज्‍ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रॅक्टीकल नॉलेज, वाय फाय कॅम्पस, सुसज्ज कॉम्प्युटर व लायब्ररी,
विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन, प्रोफेशनल गाईडन्स, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना ही महाविद्यालयाची वैशिष्ट्ये असून प्रवेशासाठी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र (महावीर गार्डन मागे) येथील महाविद्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82426 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..