कष्टातून जीवन फुलते ः शानबाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कष्टातून जीवन फुलते ः शानबाग
कष्टातून जीवन फुलते ः शानबाग

कष्टातून जीवन फुलते ः शानबाग

sakal_logo
By

39649

कष्टातूनच जीवन घडते

सचिन शानभाग ; प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंतांचा सत्कार


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः जीवनातील कोणतीही वाट सुकर नाही. त्यात संकटे, अडथळे असतात. पण आपण धेय्यानुसार कष्ट घेत चालत राहिले पाहीजे, कष्टातूनच जीवन घडते, असे प्रतिपादन हॉटेल व्यावसायिक सचिन शानबाग यांनी केले. प्रायव्हेट हायस्कूलच्या दहावी परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या गुणवंतांचा सत्कार शानबाग यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विभुते गुरुजी व अ. वि.जोशी यांच्या प्रतिमापूजनाने, दीप प्रज्वलनाने झाली.
श्री. शानबाग म्हणाले, ‘प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे पण यापुढे जाऊन त्यामागील कष्ट जाणून घ्या. म्हणजे जीवनात यशाचा मार्ग दिसेल. कष्ट करत रहा फळ आपोआप मिळेल. जीवनातील कोणतीही वाट सरळ नाही. त्यावर संकटे असतात. पण आपण कष्ट करत रहायचे. कष्टातून जीवन फुलते. आपल्या यशामध्ये सर्वाधिक वाटा हा शाळेचा आहे.’
प्रशालेच्या विद्यार्थिनी वृंद व संगीत शिक्षक सिताराम जाधव यांनी स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक एम.आर.गोरे यांनी स्वागत केले.
पर्यवेक्षक जी.एस.जांभळीकर यांनी परिचय करून दिला. श्री. शानभाग यांचा सत्कार संचालक अरुण डोंगरे यांच्या हस्ते झाला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण झाले. एस.आर.घोलकर व बी. एस.जाधव यांनी पारितोषिक यादी वाचन केले.
विद्यार्थी आभा खिरे, श्रद्धा मालेकर, नितेश शहा यांनी मनोगत व्यक्त केले. उपमुख्याध्यापिका श्रीमती एम.ए.चवरे यांनी आभार मानले. ए.पी.सुतार व एस के. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शाळा समिती अध्यक्ष मदन कुलकर्णी, उपाध्यक्ष उदय सांगवडेकर, नियामक मंडळ सदस्य भूपेंद्र शहा, केशव तिरोडकर, प्रशांत कुलकर्णी, कार्यवाह एस.आर.डिंगणकर, सहकार्यवाह पी.के. गुळवणी, मुख्याध्यापक. एम.आर.गोरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82438 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top