बालकल्याण संस्था कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकल्याण संस्था कार्यक्रम
बालकल्याण संस्था कार्यक्रम

बालकल्याण संस्था कार्यक्रम

sakal_logo
By

३९६७३
‘बालकल्याण’ला निधी देणे माझा सन्मान
ॲड. अभय नेवगी; बालकल्याण संकुलचा वर्धापन दिन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः ‘‘कोल्हापूरशी आमचे जुने ऋणानुबंध आहेत. आई-वडिलांपासून हा वारसा सुरू आहे. या शहराचे आपण देणे लागतो, या भावनेतून आईशी चर्चा केली. तिनेही बालकल्याण संकुलाला मदत करू, असा विचार व्यक्त केला. आई गेल्यानंतर याच विचारात असताना संस्थेच्या कावळा नाका येथील वसतिगृहासाठी निधीची गरज आहे आणि ती पूर्ण करू, असा विचार मनात आला. याला पत्नी कैलास आणि कन्या गौरी यांनीही हातभार लावला. म्हणूनच मी मदत देऊ शकलो, हे मी माझा सन्मान मानतो’’, अशा शब्दांत आज ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अभय नेवगी यांनी बालकल्याण संस्थेच्या कामाचा गौरव केला. जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना तथा बालकल्याण संकुलच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. दरम्यान, ॲड. नेवगी परिवारातर्फे संस्थेच्या वसतिगृहासाठी ५० लाख रुपये देणगीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘‘बालकल्याण संकुल हे फक्त बालक - महिलांसाठी आधार नाही तर आमच्या पोलिस विभागातील पोलिसांसाठी हक्काचे आधार केंद्र आहे. महापुराच्या काळात, कोर्टाच्या कामात बाहेरगावच्या पोलिसांना उशिरा होतो तेव्हा बालकल्याण संकुलाचा आम्ही रात्री-अपरात्रीही दरवाजा ठोठावतो. इथल्या चैतन्यपूर्ण वातावरणात प्रत्येक मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते, यातून संस्थेची मेहनत दिसते. प्रत्येकाने एकेक वीट दिल्यानेच ही संस्था भक्कम आहे.’’
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी संस्थेतून दत्तक दिलेली मुले देशात - विदेशात असून आनंदाने जगत आहेत, याचेच समाधान असल्याचे सांगितले. संस्थेच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कावळा नाका येथील संस्थेच्या वसतिगृहास ॲड. नेवगी यांच्या आई तिलोत्तमा नेवगी यांचे नाव दिल्याचे जाहीर केले. संस्थेच्या मुली व शिशुगृहातील बालकांनी सादर केलेल्या कलाविष्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेतील गुणंवत विद्यार्थ्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला. सहमानद कार्यवाह एस. एन. पाटील यांनी आभार मानले.
या वेळी ॲड. कैलास नेवगी, गौरी नेवगी, निरंजन वायचळ, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके, व्यंकाप्पा भोसले, प्रदीप कापडिया उपस्थित होते.

वसतिगृहासाठी १ कोटी २७ लाखांची देणगी
उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना वसतिगृहासाठी १ कोटी २७ लाख रुपयांची देणगी जमा झाल्याचे सांगितले. यामध्ये ब्रिहद भारतीय समाज, मुंबईचे श्रीपाद हळवे यांनी २५ लाख, लक्ष्मी सिव्‍हिल सर्व्हिसेसचे राजेंद्र दोशी व पार्थ शहा यांनी २५ लाख, कै. तुकाराम कुलकर्णी यांनी १५ लाख, सचिन भानुशाली यांनी ५ लाख, डॉ. सुभाष आठल्ये यांनी दोन लाख, सुरेश शिपूरकर यांनी १ लाख, एस. एन. पाटील यांनी १ लाख आणि डॉ. नरेंद्र नानिवडेकर यांनी ५० हजार रुपयांची देणगी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82454 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..