भाजप कार्यकारणी बैठक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप कार्यकारणी बैठक बातमी
भाजप कार्यकारणी बैठक बातमी

भाजप कार्यकारणी बैठक बातमी

sakal_logo
By

३९६३५

शासनाच्या योजना घरोघरी पोहोचवा
माजी मंत्री सुभाष देसाई; भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्याने विकासाला गती मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना घरोघरी पोहोचवा. त्यासाठी केवळ सोशल मीडियावर अवलंबून न राहता प्रत्येक कुटुंबाशी संपर्क करा, असे आवाहन माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केले. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते आण्णा पिसाळ यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्य सरकारने समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक चांगले निर्णय घेतले. लोकोपयोगी योजना बनवल्या. या योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी घरोघरी जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवली पाहिजे.’’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा करत असताना या देशाचा इतिहास युवा पिढीसाठी माहिती होण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. यामध्ये १३ ते १५ ऑगस्टपर्यंत देशातल्या प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून या देशाचा स्वाभिमान जपण्याची त्यांची संकल्पना आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी तिरंगा ही मोहीम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा.’’
माजी आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, ‘‘नवे सरकार अस्तित्वात आल्यापासून विकासकामांना गती मिळाली आहे. शिंदे-फडणवीस यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, इंधनाच्या किमतीत घट असे चांगले निर्णय अल्पकाळात घेतले. त्यामुळे आता पक्षालाही जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.’’
जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे यांनी स्वागत केले. सरचिटणीस विठ्ठल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संघटनसरचिटणीस नाथाजी पाटील यांनी आभार मानले.
जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भगवान काटे, महेश जाधव, माजी आम. अमल महाडिक, हिंदुराव शेळके, संजय पाटील, विजय जाधव, हेमंत अराध्ये यांच्यासह भाजप शहर व ग्रामीण जिल्ह्याचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस, आघाडी मोर्चा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, जि. प., प.स. सदस्य, आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82458 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..