
गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ
गोकुळ दुधाच्या
खरेदी-विक्री दरात वाढ
अध्यक्ष पाटील; म्हैस २, गाय दूध १ रुपयांची वाढ
कोल्हापूर, ता. ३० : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने म्हैस दूध दरात खरेदीत प्रतिलिटर २ रुपये व गाय दूध दरात प्रतिलिटर १ रुपयांची वाढ केली. जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांना मात्र प्रतिलिटर म्हैस दूध २ रुपये व गाय दूध १ रुपये जादा दराने खरेदी करावी लागणार आहे. ही दरवाढ उद्या (रविवार ) रात्री १२ पासून लागू केली जाणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे, दूध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या दुधाला चांगला दर मिळाला पाहिजे. हाच हेतू ठेवून ही दरवाढ केली आहे. दरम्यान, १ ऑगस्टपासून उत्पादकांना म्हैस दुधासाठी ६ फॅट व ९ एसएनएफसाठी ४५.५० रुपये व गाय दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतिचे एक लिटर दुधाला ३० रुपये दिले जाईल. संघाच्या कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्ये वितरीत होणाऱ्या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. गाय दूध, टोण्ड दूध, स्टॅंडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नसल्याचेही श्री पाटील यांनी कळवले आहे.
दरम्यान, दरवाढीमुळे गोकुळला दररोज २० ते २२ लाख रुपये जादा मिळणार आहेत. यापैकी ८० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना परत केली जाते. पण या निर्णयामुळे ग्राहकांना प्रतिलिटर म्हैश दूध दोन रुपये व प्रतिलिटर गाय दूध १ रुपये जादा दराने खरेदी करावी लागणार.
फॅट* एसएनएफ* पूर्वीचा दर (प्रतिलिटर)* सध्याचा दर (प्रतिलिटर)
६.०*९.०*४३.५०*४५.५०
३.५*८.५*२९.००*३०.००
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82462 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..