इंजि. व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंजि. व्याख्यान
इंजि. व्याख्यान

इंजि. व्याख्यान

sakal_logo
By

३९६९१
प्रतिकूल परिस्थितीवर मात करा
---
माधव आचार्य; कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे अमृतमहोत्सवी व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः परिस्थिती कितीही वाईट व प्रतिकूल असूदे, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपण यशाला गवसणी घालू शकता. कष्ट आणि अनुभवाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करा, यशस्वी उद्योजक व्हा, असा मूलमंत्र माधव आचार्य यांनी आज येथे दिला. कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित अमृतमहोत्सवी व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्याख्यानमालेचे हे आठवे पुष्प होते.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बेळगावचे फौंड्री उद्योजक व अभिषेक अलॉय प्रा.लि.चे संचालक माधव आचार्य यांचे ‘अभिषेक अलॉयची वाटचाल’ या विषयावर, तर त्यांचे पुत्र मयूर आचार्य यांचे ‘फौंड्री उद्योगांसमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात व्याख्यान झाले.
माधव आचार्य म्हणाले, ‘‘मला अतिशय किचकट उत्पादन करायला आनंद मिळतो. निसर्ग ज्याप्रमाणे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतो व आपणास शुद्ध हवा देतो, सावली देतो, फळे देतो त्याप्रमाणे आताच्या पिढीनेही वेदना शिकल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत व समाजाला घडविण्यात योगदान दिले पाहिजे. माझे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्यात अनेकांनी हातभार लावला आहे.’’
मयूर आचार्य म्हणाले, ‘‘आमच्या उद्योगांमध्ये बारकोडचा वापर सुरू केल्याने अनेक कामे सोपी झाली. मालक हा धोका पत्करून उद्योग करीत असतो, त्याचा आज घेतलेला प्रत्येक निर्णय चार ते पाच वर्षांनी तो चुकीचा वाटतो. आपण शासनाला उद्योग सांभाळून अनेक प्रकारचे कर देतो, शासनानेही आपणास नेहमीच संकट काळात मदत केली पाहिजे.’’
प्रश्‍नोत्तरानंतर माधव आचार्य आणि मयूर आचार्य यांच्या हस्ते आजीव सभासदांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अध्यक्ष हर्षद दलाल यांनी प्रास्ताविक केले. सचिव कमलाकांत कुलकर्णी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. असोसिएशनचे अध्यक्ष हर्षद दलाल आणि दिनेश बुधले यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
प्रसन्न तेरदाळकर, श्रीकांत दुधाणे, नितीन वाडीकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, एम. वाय. पाटील, सचिन पाटील, श्यामसंदुर देशिंगकर, मुबारक शेख, अनिल कुडचे, किरणभाई वसा, डी. डी. पाटील, सुरेश मंडलिक, आनंद पेंडसे, नलिनी नेने, अशोक जाधव, ए. टी. सातवेकर यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82472 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..