गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त

sakal_logo
By

39703
गडहिंग्लज : प्रियदर्शिनी पतसंस्थेतर्फे डॉ. सदानंद पाटणे यांचा सत्कार करताना रुद्रगोंडा पाटील. शेजारी विश्वास देवाळे, गजेंद्र बंदी, डॉ. सीमा पाटणे, डॉ. सुरेश संकेश्‍वरी.

‘प्रियदर्शिनी’तर्फे डॉ. पाटणे यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. पाटणे प्रियदर्शिनी पतसंस्थेचे संचालक आहेत. त्यांची नुकतीच बेळगाव जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी बेळगाव जिल्ह्याबाहेरील निवड झालेले डॉ. पाटणे पहिलेच ठरले आहेत. त्याबद्दल ‘प्रियदर्शिनी’चे अध्यक्ष रुद्रगोंडा पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला. संचालक डॉ. सुरेश संकेश्‍वरी यांचे भाषण झाले. डॉ. पाटणे यांच्या निवडीचा संस्थेला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पाटणे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालक अरुण शहा, बाबासाहेब पाटील, शिवाजी गवळी, आप्पासाहेब पाटील, डॉ. सीमा पाटणे, अंजली संकेश्‍वरी, तज्ज्ञ संचालक अॅड. विश्‍वनाथ पाटील, सरव्यवस्थापक विश्‍वास देवाळे, लेखापरिक्षक गजेंद्र बंदी आदी उपस्थित होते.
-----------------
39704
गडहिंग्लज : साधना प्रशालेत झालेल्या शालेय जिमखाना निवडणुकीत मतदानासाठी लागलेली विद्यार्थिनींची रांग.

‘साधना’मध्ये जिमखाना निवडणूक
गडहिंग्लज : येथील साधना प्रशालेत शालेय जिमखाना निवडणूक झाली. ज्ञानेश राक्षे याची जनरल सेक्रेटरीपदी, तर प्रतिभा कुपन्नावर हिची विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी निवड झाली. निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली. मतदान प्रक्रिया शिस्तबद्धरितीने पार पाडली. मतदानासाठी शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड अनिवार्य केले होते. ९४.३० टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मुख्याध्यापक जी. एस. शिंदे, पर्यवेक्षक आर. एन. पटेल, संस्थेचे संचालक अरविंद बारदेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. आर. नाईक, पी. आर. बैरागी, आर. सी. हिरेमठ, डी. एस. अडसुळे यांनी निवडणूक प्रक्रियेचे नियोजन केले होते.
------------------
भीमनगरातील रस्त्यासाठी
तेरा लाखांचा निधी मंजूर
गडहिंग्लज : येथील भीमनगरातील रस्त्याच्या कामासाठी १२ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी हा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भीमनगरातील शिंदे यांच्या घरापासून ते चावडे यांच्या घरापर्यंत ते संभाजी गुंठे यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. माजी नगरसेवक हरुण सय्यद, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांनी या रस्त्याला निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले.
----------------
39705
महादेव भकरी, लता गुरव

ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या
अध्यक्षपदी भकरी, गुरव उपाध्यक्ष
गडहिंग्लज, ता. 31 : येथील गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी महादेव भकरी यांची. तर उपाध्यक्षपदी लता गुरव यांची निवड झाली. शिवाजी मांगले यांच्यावर खजिनदारपदाची, सचिन ओहरा यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी दिली आहे. संघटनेच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भकरी व ओहरा यांची भाषणे झाली. या वेळी माजी अध्यक्षा सुषमा पोवार, संतोष नलवडे, सुधा सावंत, भिमाप्पा वाळकी, सुभाष खोत, वंदना तोडकर, राजू गुरव, सोनल पाटील, प्रताप घाटगे यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी उपस्थित होते.
---------------
39706
पौर्णिमा माने, स्मिता शेंडे

शिवराज फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीचा प्रथम व व्दितीय वर्षाचा निकाल लागला. प्रथम वर्षाचा ९८ टक्के, तर व्दितीय वर्षाचा ९९ टक्के निकाल लागला. प्रथम वर्षात पौर्णिमा माने (८३.२० टक्के), अमृता कुरळे (७७.२०), भक्ती गुरबे (७६.१०) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले. व्दितीय वर्षाच्या स्मिता शेंडे (७८.६०), मृणाल देसाई (७८.५०), श्रुतिका देसाई (७८.४०) यांनी अनुक्रमे तीन क्रमांक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. संतोष कुरबेट्टी यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y82510 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top